महाराष्ट्र

maharashtra

मुंबईत सोमवारी 86 हजार 887 लाभार्थ्यांचे लसीकरण

By

Published : Jun 1, 2021, 1:11 PM IST

मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेनुसार सोमवार ते बुधवार वॉक इन पद्धतीने येणाऱ्या तर गुरुवार ते शनिवार नोंदणी पद्धतीने येणाऱ्या 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. आज सोमवारी 86 हजार 887 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 32 लाख 76 हजार 41 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

मुंबईत लसीकरण
मुंबईत लसीकरण

मुंबई - मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेनुसार सोमवार ते बुधवार वॉक इन पद्धतीने येणाऱ्या तर गुरुवार ते शनिवार नोंदणी पद्धतीने येणाऱ्या 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. आज सोमवारी 86 हजार 887 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 32 लाख 76 हजार 41 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

लसीकरणाची आकडेवारी

मुंबईत लसीकरण
मुंबईत आज 86 हजार 887 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 83 हजार 340 लाभार्थ्यांना पहिला तर 3 हजार 547 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 32 लाख 76 हजार 41 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 25 लाख 25 हजार 932 लाभार्थ्यांना पहिला, तर 7 लाख 50 हजार 109 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांना 3 लाख 3 हजार 405, फ्रंटलाईन वर्करना 3 लाख 61 हजार 485, जेष्ठ नागरिकांना 12 लाख 20 हजार 686, 45 ते 59 वर्षामधील नागरिकांना 11 लाख 51 हजार 104 तर 18 ते 44 वर्षामधील नागरिकांना 2 लाख 38 हजार 329 तसेच 1 हजार 32 स्तनदा मातांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. लसीकरण मोहीम सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्करना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. 1 मे पासून 18 ते 45 वर्षामधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरु झाले आहे. सोमवार ते बुधवार जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांग यांचे लसीकरण केले जाणार आहे. तर गुरुवार ते शनिवार पर्यंत कोविन अॅपवर नोंदणी करून मोबाईलवर संदेश आला असेल तरच, लसीकरणाला या असे आवाहन पालिकेने केले आहे. स्तनदा माता आणि गरोदर महिलांचेही लसीकरण केले जाणार आहे.

हेही वाचा- सोलापूर जिल्ह्यातील सर्व लहान मुलांची तपासणी होणार

ABOUT THE AUTHOR

...view details