महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bombay High Court: न्यायालयाचा वापर प्रख्यात व्यक्तींना त्रास देण्यासाठी होऊ शकत नाही; सलमान खानवरील एफआयआर रद्द करताना न्यायमूर्तींचे वक्तव्य

न्यायालयाचा वापर छळ करण्यासाठी आधार होऊ शकत नाही, सलमान खानचा एफआयआर रद्द करताना न्यायमूर्तींचे वक्तव्य केले. न्यायालयाचा वापर प्रख्यात व्यक्तींना त्रास देण्यासाठी होऊ शकत नाही, अभिनेता सलमान खानवरील खटला रद्द करताना मुंबई उच्च न्यायालयाने हे उद्गार काढले.

Bombay High Court
मुंबई उच्च न्यायालय

By

Published : Apr 12, 2023, 7:45 AM IST

मुंबई :मुंबईमध्ये पत्रकाराला धमकावल्या प्रकरणे सलमान खान याच्यावर आरोप ठेवला गेला होता. त्यासंबंधी गुन्हा देखील दाखल झाला होता. मात्र हा गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला. न्यायालयाचा वापर प्रख्यात व्यक्तीना त्रास देण्यासाठी उपयोग करता येणार नाही. कोणाच्याही छळासाठी न्यायालयाचा वापर कदापी करता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. पत्रकाराला धमकी देण्याची घटना 2020 मध्ये घडली होती. उच्च न्यायालयाने सलमान खानला या प्रकरणामध्ये दिलासा दिलेला आहे. सलमान खानवर दाखल केलेली एफआयआर तसेच जारी केलेला समन्स देखील उच्च न्यायालयाने रद्द केला आहे.




सलमान खानवरील एफआयआर रद्द : अंधेरी येथे सलमान खान सायकलवर सहज फिरत असताना पत्रकाराने सलमान खानचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेला सलमान खानने त्याच्याकडील मोबाईल घेतला. त्याला धमकावले अशा पद्धतीचा आरोप त्या पत्रकाराने अंधेरीतील पोलीस ठाण्यामध्ये दाखल केला होता. त्याबद्दल एफआयआर देखील नोंदवला गेला होता. याप्रकरणी हा खटला महानगर न्याय दंडाधिकारी यांच्याकडून उच्च न्यायापर्यंत पोहोचला. उच्च न्यायालयामध्ये हा खटला दाखल झाल्यावर उच्च न्यायालयाने घटनेतील तथ्य समजावून घेतल्यानंतर सलमान खान याच्यावरील दाखल केलेला एफआयआर रद्द केला होता. न्यायमूर्ती भारतीय डांगरे यांनी याबाबत खटला रद्द करताना महत्त्वाचे वक्तव्य देखील केले आहे.



तक्रारदारकडून अनावश्यक दडपशाही : आपल्या न्यायिक आदेशामध्ये त्यांनी नमूद केलेले आहे की, न्यायालयाची प्रक्रिया ही कोणासाठीही त्रास देण्याचे साधन होऊ शकत नाही. कोणालाही या प्रक्रियेमुळे छळ करण्यासाठी बळ मिळू शकत नाही. आरोपी सेलिब्रिटी आहे आणि त्यांनी कायद्याच्या प्रक्रियेचे पालन जर केले नाही. तर त्याबाबतचा विचार होऊ शकतो.मात्र तक्रारदारकडून अनावश्यक दडपशाही न्यायालीन यंत्रणा सहन करणार नाही. सूडबुद्धेने कुठलाही खटला न्यायालयामध्ये दाखल करून न्यायालयाचा वापर त्रास देण्याच्या हेतूने कोणीही करू शकणार नाही.


हेही वाचा : Salman Khan: पत्रकार धमकी प्रकरणात सलमानला हायकोर्टाचा दिलासा

ABOUT THE AUTHOR

...view details