मुंबई :सणांची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक मुलीला तिच्या चेहऱ्यावरची चमक पाहायची असते. यासाठी ती अनेक प्रयत्न करते आणि स्किन केअर रूटीन टिप्सचे ( Skin care routine tips )पालनही करते. पण जर चेहऱ्यावर निस्तेजपणा दिसत असेल तर या टिप्सच्या मदतीने तुमचा चेहराही चमकू लागेल. पार्लरमध्ये महागडे फेशियल किंवा उत्पादने वापरण्याऐवजी तुम्ही घरगुती उपायांच्या मदतीने त्वचा उजळ करू ( natural glow ) शकता. चला तर मग जाणून घेऊया कोणते उपाय तुमच्या त्वचेवर चमक आणण्यास मदत करतील.
नैसर्गिक गोष्टी वापरा :चेहरा स्वच्छ करण्यासाठी अनेकदा रासायनिक उत्पादने वापरली जातात. जसे की फेस वॉश. त्यामुळे अनेक वेळा चेहऱ्याची चमक कमी होऊ लागते. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही मुलतानी माती किंवा बेसन यांसारख्या नैसर्गिक गोष्टींनी चेहरा स्वच्छ करू शकता. यामुळे त्वचेला इजा न होता स्वच्छ होईल.
डेड स्किम :चेहर्याची त्वचा मऊ असते. त्वचेला टॅनिंगपासून दूर ठेवण्यासाठी चेहऱयावरून डेड स्किन काढून टाका. बाजारातील केमिकल स्क्रब वापरण्याऐवजी तुम्ही हवे असल्यास घरगुती स्क्रब चेहऱ्यावर लावून चेहरा स्वच्छ करू शकता.