मुंबई- लेझीम आणि ढोल ताशांच्या गजरात नववर्ष स्वागत समिती चारकोपच्या वतीने चारकोप परिसरात स्वागत यात्रेला सुरुवात झाली आहे. यावेळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून या स्वागत यात्रेत सहभागी झाली.
उर्मिला मातोंडकर चारकोपमधील स्वागत यात्रेत सहभागी, लेझीमवर धरला ठेका - gudi padwa
गेल्या १४ वर्षांपासून चारकोपमध्ये नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येते. सांस्कृतिक महत्त्व असलेल्या या गुढी पाडवा स्वागत यात्रेत जनमतातून राष्ट्ररक्षा हा विषय मांडण्यात आला.
उर्मिला चारकोपमधील स्वागत यात्रेत
गेल्या १४ वर्षांपासून चारकोपमध्ये नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येते. सांस्कृतिक महत्त्व असलेल्या या गुढी पाडवा स्वागत यात्रेत जनमतातून राष्ट्ररक्षा हा विषय मांडण्यात आला. या यात्रेत उर्मिलाने लेझीमच्या तालावर ठेका धरला आणि नववर्षाच्या सर्व मराठी बांधवांना शुभेच्छा दिल्या. उर्मिला उत्तर मुंबईतून काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सध्या ती प्रचारात व्यग्र आहे.
Last Updated : Apr 6, 2019, 12:04 PM IST