महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Urfi Javed Vs Chitra Wagh : चित्रा, माझी सासू उर्फीने पुन्हा भाजप नेत्या चित्रा वाघ यांना डिवचले - BJP leader Chitra Wagh

उर्फी जावेद यांनी ( Actress Urfi Javed ) पुन्हा एकदा भाजप नेत्या चित्रा वाघ ( BJP leader Chitra Wagh ) यांची खिल्ली उडवली आहे. त्यांनी एक ट्विट ( Urfi Javed Tweet ) करीत मेरी डिपी इतनी ढासू चित्रा वाघ मेरी सासू असे ट्विट केले आहे. उर्फी जावेद यांनी केलेल्या ट्विटमुळे चित्रा वाघ यांना अव्हान दिले आहे.

Urfi Javed Vs Chitra Wagh
उर्फी जावेद विरुद्ध चित्रा वाघ

By

Published : Jan 9, 2023, 8:06 PM IST

मुंबई - तंग कपड्यांवरुन उर्फी जावेद, भाजप नेत्या चित्रा वाघ ( BJP leader Chitra Wagh ) यांच्यात जुंपली आहे. मारण्याची धमकी दिल्यानंतर उर्फीने वाघ यांना डिवचण्याची एकही संधी सोडलेली नाही. उर्फीने आता 'माझा डीपी ढासू, चित्रा माझी सासू', अशा आशयाचा नवे ट्वीट ( Urfi Javed Tweet ) करत, वाद ओढवून घेतला आहे. दोघींमध्ये यामुळे पुन्हा खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

उर्फी जावेद

चित्रा वाघ यांना ट्वीटरवरुन जशास तसे प्रत्युत्तर - बिग बॉस फेम ( Bigg Boss fame ) अभिनेत्री उर्फी जावेद ( Actress Urfi Javed ) गेल्या काही दिवसांपासून तंग कपड्यांवरुन चांगलीच चर्चेत आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या वरून उर्फीवर कारवाईची मागणी लावून धरली आहे. मुंबई पोलिसांना देखील या संदर्भात पत्र दिले आहे. तसेच उर्फीने नंगानाच सुरु ठेवलाच तर तिचे थोबाड फोडणार, त्यापूर्वी तिला साडी चोळी भेट ही देऊ, अशी भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली आहे. चित्रा वाघ यांच्या आव्हानाला उर्फी जावेद कडून ट्वीटरवरुन जशास तसे प्रत्युत्तर दिले जात आहे. आता उर्फीने ट्वीटवर ट्वीट करत चित्रा वाघ यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

Urfi Javed Vs Chitra Wagh

चित्रा वाघ यांनाच आव्हान -उर्फी जावेदने थेट ट्वीट चित्रा वाघ यांना टॅग केले आहे. ट्वीटमध्ये उर्फी म्हणतेय की, लेकिन अभी बोहोत सुधार बाकी है. सॉरी चित्रा वाघ जी. आय लव्ह यू. तर दुसऱ्या एका ट्वीटमध्ये, मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू, असा उल्लेख केला आहे. थेट चित्रा वाघ यांनाच आव्हान दिल्याने हा वाद पेटणार आहे.


मुली नागड्या फिरत नाहीत - तुम्ही चार भितींच्या आतमध्ये काय करता, हा तुमचा प्रश्न आहे. पण, सार्वजनिक ठिकाणी आणि समाजात असल्यावर तुम्हाला कपड्यांचे भान असायला हवे. मुली जीन्स, टॉप्स, फ्रॉक घालतात. त्या उघड्या-नागड्या फिरत नाहीत. ते कपडे आणि ही बाई नंगानाच करत आहे, याच्यात फरक आहे. फॅशन आणि नंगानाच याच्यामध्ये काही आहे का नाही?, असा सवाल चित्रा वाघ यांनी तुळजापूरात विचारला आहे. तसेच उर्फी जावेदवर जोरदार टीका केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details