महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातव्या वेतन आयोगासाठी मुंबई विद्यापीठात कामबंद आंदोलन; 15 जुलैपासून बेमुदतचा इशारा - सातवा वेतन आयोग

राज्यातील अधिकारी कर्मचाऱयांना सातवा वेतन आयोग लागू झाला. मात्र विद्यापीठातील आणि महाविद्यालयांतील अधिकारी-कर्मचाऱयांना अद्यापही सातवा वेतन आयोग लागू झाला नाही. त्यामुळे राज्यभरातील दहा हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये याविषयी तीव्र नाराजी पसरली आहे.

काम बंद आंदोलन

By

Published : Jun 29, 2019, 9:19 PM IST

मुंबई - राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आगायोची अंमलबजावणी सुरू झाली आहे. परंतु विद्यापीठ आणि महाविद्यालयीन स्तरावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मात्र सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठात शनिवारी सकाळपासून काम बंद आंदोलन पुकारण्यात आले होते.

मुंबई विद्यापीठात काम बंद आंदोलन पुकारण्यात आले

राज्यातील अधिकारी कर्मचाऱयांना सातवा वेतन आयोग लागू झाला. मात्र विद्यापीठातील आणि महाविद्यालयांतील अधिकारी-कर्मचाऱयांना अद्यापही सातवा वेतन आयोग लागू झाला नाही. त्यामुळे राज्यभरातील दहा हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये याविषयी तीव्र नाराजी पसरली आहे. या नाराजीचे पडसाद शनिवारी मुंबईसह राज्यातील विद्यापीठांमध्ये उमटले.

मुंबई विद्यापीठात सकाळपासूनच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारत आम्हाला सातवा वेतन आयोग लागू करावा आणि आमच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्या यासाठी कलिना आणि फोर्ट संकुलात निदर्शने केली. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर 15 जुलैपासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details