महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जुहू चौपाटीवर आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह - पोलीस

सकाळी जुहू चौपाटीवर मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना एक मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे निदर्शनास आले. मृत तरुण अंदाजे २५ वर्षाचा असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

जुहू चौपाटीवरील मृतदेह

By

Published : Jun 18, 2019, 4:39 PM IST

मुंबई- जुहू चौपाटीवर आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसून मृतदेह पालिकेच्या कूपर रुग्णालयात ठेवण्यात आला. या बाबतची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सकाळीस जुहू चौपाटीवर मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना एक मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती तेथे असलेल्या लाईफगार्डना दिली. लाईफगार्डनी हा मृतदेह पाण्यातून काढून पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी मृतदेह पुढील तपासणीसाठी पालिकेच्या कूपर रुग्णालयात पाठवला.

रुग्णालय प्रशासनाने त्या वक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मृत तरुण अंदाजे २५ वर्षांचा असून त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. याबाबत पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details