मुंबई- मुंबईत कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक झोपडपट्टी भागात वैद्यकीय सुविधा पोहोचायला अनेक अडचणी येतात. मात्र, आता रिक्षामध्ये रुग्ण वाहतुकीसाठी सोय केली जाणार आहे. यामुळे झोपडपट्टी भागातील रुग्णांना सेवा देणे सोयीचे होणार आहे. याबाबत काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी एक व्हिडिओ आपल्या ट्विटर खात्यावरुन शेअर केला आहे.
ही रिक्षा खास झोपडपट्टी भाग व लहान रस्त्यांचा विचार करून तयार करण्यात येत आहे. या रिक्षामध्ये रुग्णासाठी खाट, आरोग्य कर्मचाऱ्याला बसण्यासाठी जागा व ऑक्सीजनची सोय असणार आहे. त्याचबरोबर स्वयंचलित सॅनिटायझर स्प्रे, प्रथमोपचार पेटी, जनरेटरची सोय करण्यात आली आहे. ही रिक्षा लवकरच बृहन्मुंबई महापालिकेच्य ताब्यात देण्यात येणार आहे.