महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Uddhav Thackeray : 'पालघर हत्याकांडावर उत्तर देऊ शकले नाहीत, आता मणिपूरवरून आम्हाला शिकवतायेत' - पालघर साधू मॉब लिंचिंगवर अनुराग ठाकूर

2020 मध्ये घडलेले पालघर साधूंचे हत्याकांड आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या घटनेचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे

By

Published : Jul 23, 2023, 9:12 PM IST

मुंबई : 16 एप्रिल 2020 रोजी पालघरमध्ये काही साधूंसोबत मॉब लिंचिंगची घटना घडली होती. या घटनेवरून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. या प्रकरणाने त्यावेळी चांगलाच पेट घेतला होता. आता ही घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या घटनेचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मणिपूरच्या घटनेवरून विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.

'पालघरमध्ये साधूंच्या हत्येबाबत उत्तर देऊ शकले नाहीत' : अनुराग ठाकूर म्हणाले की, 'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते पालघरमध्ये साधूंच्या निर्घृण हत्येबाबत काहीच उत्तर देऊ शकले नाहीत. ते त्यावेळी चर्चेलाही तयार नव्हते. आम्ही मात्र मणिपूरबाबत चर्चा करण्यास तयार आहोत, तर विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत, असे टीकास्त्र त्यांनी सोडले. ते म्हणाले की, 'विरोधकांची अशी काय मजबुरी आहे की त्यांना चर्चेत तर राहायचे आहे, पण मात्र चर्चा करायची नाही'.

काय आहे प्रकरण? :16 एप्रिल 2020 रोजी पालघर जिल्ह्यात जमावाने 70 वर्षीय साधू कल्पवृक्ष गिरी आणि 35 वर्षीय साधू सुशील गिरी यांच्यासह त्यांचा चालक नीलेश तेलगडे यांची बाळाचे अपहरण केल्याच्या संशयावरून हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी सुमारे 250 जणांना अटक केली होती. दोन्ही साधू मुंबईहून सुरतला त्यांच्या कारने जात असताना पालघरच्या गडचिंचाळे गावात जमावाने त्यांची हत्या केली.

18 पोलिस अधिकाऱ्यांना शिक्षा झाली : या प्रकरणाने पेट घेतल्यावर विभागीय चौकशीनंतर 18 पोलिस अधिकाऱ्यांना शिक्षा झाली. या प्रकरणी एका सहायक पोलिस निरीक्षकाला बडतर्फ करण्यात आले तर दुसऱ्या सहायक पोलिस उपनिरीक्षकावरही कडक कारवाई करण्यात आली होती. या घटनेसंदर्भात खून, दंगल आणि इतर कलमांखाली एकूण तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. ठाणे सत्र न्यायालयाने 2021 मध्ये या प्रकरणातील 89 आरोपींना जामीन मंजूर केला होता.

हेही वाचा :

  1. NCP Women Front Protest: मणिपूरच्या घटनेवर चित्रा वाघ गप्प का? राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीचा सवाल
  2. Uddhav Thackeray Birthday : वाढदिवस साजरा न करण्याचा उद्धव ठाकरेंचा निर्णय, ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
  3. Manipur Violence : 'मिझोरम सोडा, नाहीतर...', मैतेई समुदायाच्या नागरिकांना धमकी; सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये

ABOUT THE AUTHOR

...view details