मुंबई - येथील लालबागच्या राजाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज (सोमवारी) कुटुंबासोबत दर्शन घेतले. महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर बाप्पाकडे पुन्हा एकदा युतीचे सरकार यावे, यासाठी नवस तर बोलला नसेल ना अशी चर्चा त्यांनी दर्शन घेतल्यानंतर दर्शन घेणाऱ्या भाविकांमध्ये होत होती.
केंदीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनाला - Amit Shah Laal Baagcha raja Mumbai
शाह बाप्पाचे दर्शन घेत असताना मोदी-मोदीच्या घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी त्यांची नात ही त्यांच्यासोबत होती. सध्या ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.
केंदीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन घेताना
शाह बाप्पाचे दर्शन घेत असताना मोदी-मोदीच्या घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी त्यांची नात ही त्यांच्यासोबत होती. सध्या ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.