मुंबई -सुजय विखे यांची निवडणूक आटोपताच त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. विखेंनी विरोधी पक्षनेतेपद सोडले व आता काँग्रेसचाही राजीनामा देतील, असे शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पत्रकातून म्हटले आहे.
राधाकृष्ण विखेंनी तळ्यात-मळ्यातला संभ्रम संपवला - उद्धव ठाकरे
राधाकृष्ण विखेंनी मुलगा सुजय विखेसाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर, राधाकृष्ण विखेंवर काय कारवाई होईल, असे प्रश्न उपस्थित होत होते.
राधाकृष्ण विखेंनी मुलगा सुजय विखेसाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर, राधाकृष्ण विखेंवर काय कारवाई होईल, असे प्रश्न उपस्थित होत होते. मात्र, आता खुद्द राधाकृष्ण विखेंनीच काँग्रेसच्या पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याने या प्रश्नांना पूर्णविराम मिळाला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
राधाकृष्ण विखे-पाटील यांचे तळ्यात मळ्यात एकदाचे संपले. त्यामुळे काँग्रेसही सुटली व ते स्वतःही मनमोकळे झाले. विखेंनी काँग्रेस सोडणे, म्हणजे नगर जिह्यातील संपूर्ण काँग्रेसनेच राजीनामा देण्यासारखे आहे. प्रश्न इतकाच आहे की, विखे जाणार कुठे? ते सुपुत्र सुजयचे बोट पकडून भाजपात जाणार की त्यांच्या मनात आणखी काही घोळत आहे, असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.