मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या ७ मार्चला अयोध्येला जाणार आहेत.शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे असंख्य शिवसैनिकांसह अयोध्येत जाणार असल्याची माहिती दिली. ऐतिहासीक सोहळ्यात सहभागी होण्याचे अवाहनही राऊत यांनी केले आहे.
प्रभू श्रीरामाची कृपा आहे. सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येस जातील, असे २२ जानेवारीला ट्वीट करून संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे पुन्हा अयोध्या दौरा करणार आहेत, याची माहिती दिली होती.