मुंबई- लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने अयोध्या मिशन-2 हाती घेतले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि 18 नवनिर्वाचित खासदार पुन्हा अयोध्येत जाऊन रामलल्लाच दर्शन घेणार आहेत. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्यांवर पुन्हा एकदा शिवसेना आक्रमक झाली आहे. त्याबरोबरच आगामी काळात राम मंदिर प्रश्न तडीस लावण्यासाठी शिवसेनेची दबावाची भूमिका पाहायला मिळणार आहे.
हिंदुत्वाच्या मुद्यावर सेना आक्रमक, खासदारांसह उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि 18 नवनिर्वाचित खासदार पुन्हा अयोध्येत जाऊन रामलल्लाच दर्शन घेणार आहेत. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्यांवर पुन्हा एकदा शिवसेना आक्रमक झाली आहे.
आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरातील अंबाबाईच दर्शन घेतले. त्यानंतर उद्धव ठाकरे व नवनिर्वाचित 18 खासदार रामल्लाचे आशीर्वाद घेण्यासाठी अयोध्येला जात आहेत. त्यामुळे राम मंदिराचा मुद्दा लक्षात असल्यामुळे आम्ही अयोध्येला जात असल्याचे आमदार मनीषा कायंदे यांनी सांगितले. त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना ही माहिती दिली.
शिवसेनेने भाजपशी हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर युती केली आहे. त्यामुळे येत्या 5 वर्षांत राम मंदिराचा मुद्दा पूर्ण व्हायला पाहिजे. त्यासाठी शिवसेनेचे 18 खासदार लोकसभेत हा प्रश्न वेळोवेळी लावून धरतील व सरकारकडे याबाबत पाठपुरावा, असेही कायंदे यांनी यावेळी सांगितले.