महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'महा'शपथविधी संपन्न.. उद्धव ठाकरे मुख्यमंंत्री, नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा - mahavikas agahdi

महाविकास आघाडीच्या शपथविधी सोहळा पार पडला आहे. उद्धव ठाकरे राज्यातील या नवीन राजकीय समीकरणाचे प्रतिनिधित्व करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या सोबत काँग्रेसचे बाळासाहेब थोरात व नितीन राऊत यांनीही शपथ घेतली. तसेच, त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील व छगन भुजबळ यांनीही मंत्रिपदे स्वीकारली.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

By

Published : Nov 28, 2019, 10:07 AM IST

Updated : Nov 28, 2019, 11:04 PM IST

मुंबई- राज्यात सुमारे महिनाभर सुरू असलेला मुख्यमंत्रिपदावरील सत्तापेच सुटला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा शिवाजी पार्कवर झाला. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे.

Live Updates -

  • 07.40 PM - 'हीच ती वेळ होती'..लोकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल शब्द नाहीत - आदित्य ठाकरे
  • 07.30 PM -सुप्रिया सुळेंनी मानले सर्वांचे आभार
  • 07.23 PM - 'अखेर रयतेचे राज्य'... जयंत पाटलांकडून जनतेचे आभार
  • 07.17 PM -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्या शुभेच्छा
  • 07.15 PM -शपथविधीनंतर एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले
  • 07.10 PM - जयंत पाटील यांची भावनिक पोस्ट
  • 06.58 PM -काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांसोबतच नितीन राऊत यांनाही मंत्रीपदाची शपथ
  • 06.52 PM - राष्ट्रवादीचे जयंत पाटील व छगन भुजबळ यांना मंत्रीपदाची शपथ
  • 06.47 PM - एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांनी घेतली गोपनियतेची शपथ
  • 06.42 PM - शपथविधीला सुरुवात
  • 06.40 PM - शरद पवार मंचावर दाखल
  • 06.38 PM - निता अंबानी स्टेजवर उपस्थित
  • 06.35 PM - राज्यपाल कोश्यारी शिवतीर्थावर दाखल
  • 06.30 PM -बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला ठाकरे कुटुंबीयांकडून आदरांजली
  • 06.24 PM -अंबानी कुटुंबीय शपथविधिला हजर
  • 06.22 PM -राज ठाकरेंचे शिवसेनेकडून मंचावर स्वागत
  • 06.20 PM -उद्धव ठाकरे शिवाजी पार्ककडे रवाना
  • 06.15 PM - संजय राऊत व धिरज देशमुख एकत्र मंचावर
  • 06.12 PM -काँग्रेसचे दिल्लीतील चेहरे मल्लिकार्जुन खर्गे, कपिल सिब्बल, अहमद पटेल दाखल
  • 06.10 PM - मनसेचा एकमेव आमदार दाखल; शर्मिला ठाकरे अनुपस्थित
  • 06.00 PM - काँग्रेस व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पोहोचले
  • 05.50 PM -राज ठाकरे सहकुटुंब दाखल
  • 04.45 PM - सोनिया गांधी राहणार अनुपस्थित; पत्राद्वारे महाविकास आघाडीला शुभेच्छा
  • 04.40 PM - बाळासाहेब थोरात, नितीन राऊत हे दोघेही आज मंत्रीपदाची शपथ घेणार
  • 04.33 PM - संविधानाच्या मुल्यांवर सरकार चालवणार - नवाब मलिक
  • 04.31 PM - नाणार आणि बुलेट ट्रेनचा लवकरच निर्णय घेणार - एकनाथ शिंदे
  • 04.30 PM - किमान समान कार्यक्रमात शेतकरी आग्रस्थानी - जयंत पाटील
  • 04.25 PM - शेतकऱयांची कर्जमुक्ती हाच तिन्ही पक्षांचा अजेंडा - शिंदे
  • 04.20 PM -जयंत पाटील, एकनाथ शिंदे, नवाब मलिक उपस्थित
  • 02.39 PM - शिवसेनेकडून सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे शपथ घेतील
  • 02.21 PM -आज मी शपथ घेणार नाही. पार्टीने आज दोन जणांना मंत्रिपद देण्याचं ठरवलं आहे. मुख्यमंत्र्यांसोबत प्रत्येक पक्षाचे 2 नेते शपथ घेतील. जयंत पाटील आणि छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
  • 02.09 PM - अजित पवार 'सिल्वर ओक'वर दाखल, काका पुतण्यामध्ये चर्चा
  • 01.30 -जयंत पाटील आणि छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेणार
  • 01.01 -आज अजित पवारांचा शपथविधी नाही - नवाब मलिक
  • 12.41 PM - संध्याकाळी 4 वाजता महाविकास आघाडीची पत्रकार परिषद, किमान समान कार्यक्रमावर चर्चा
  • 12.22 AM -अजित पवार उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता, शपथविधीला राहणार उपस्थित
  • 12.14 AM -मासाहेब आणि आदरणीय बाळासाहेब आज तुमची खूप आठवण येते आहे - सुप्रिया सुळे
  • 12.00 PM- डीएमके अध्यक्ष एमके स्टॅलिन मुंबईत दाखल, शपथविधीला राहणार उपस्थित
  • 11.35 AM -शिवाजी पार्कवर नेतेमंडळी येण्यास सुरुवात, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे आदेश बांदेकर, प्रशासकीय अधिकारी उपस्थित
  • शपथविधीला हे नेते उपस्थित राहण्याची शक्यता
  1. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी
  2. मनसे अध्यक्ष राज ठाकरे
  3. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
  4. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
  5. टीडीपीचे चंद्रबाबू नायडू
  6. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत
  7. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव
  8. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा
  • 11.03 AM -भाजपने महाराष्ट्रात निर्लज्ज प्रयत्न केले, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांचे प्रयत्न फसले - सोनिया गांधी
  • 10.51 AM -आजचा सूर्योदय एक नवा इतिहास रचतोय - सुप्रिया सुळे
  • 10.51 AM -आजचा शपथविधी सोहळा म्हणजे, नव्या युगाचा प्रारंभ. महाविकासआघाडीचे सरकार कार्यकाळ पूर्ण करणार आणि जनतेची कामंही करणार - बाळासाहेब थोरात
  • 10.42 AM -शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि 'महाविकास आघाडी' नेते यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी शिवाजी पार्कमधील 'बाळासाहेब ठाकरे समाधी' सजवण्यात आली आहे.
  • 10.41 AM -जवळपास 700 शेतकऱ्यांना शपथविधीचे आंमत्रण
  • 10.41 AM - शपथविधीपूर्वी मुंबईत बाळासाहेब ठाकरे, इंदिरा गांधी यांच्या भेटीचे बनर्स लागले
  • 10.19 AM -महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक - संजय राऊत
  • 09.58 AM -'सामना'चं संपादकपद उद्धव ठाकरेंनी सोडलं, संजय राऊतांकडे जबाबदारी
Last Updated : Nov 28, 2019, 11:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details