महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उद्धव ठाकरे, संजय राऊतांना दिलासा; 100 कोटींच्या मानहानी खटल्यात जामीन मंजूर

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना जामीन मंजूर झालाय. मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना प्रत्येकी 15,000 रुपयांचा जामीन मंजूर केलाय.

Uddhav Thackeray Sanjay Raut Bail
Uddhav Thackeray Sanjay Raut Bail

By

Published : Aug 21, 2023, 5:22 PM IST

Updated : Aug 21, 2023, 5:54 PM IST

मुंबई : 'सामना' दैनिकाद्वारे बदनामी केल्याप्रकरणी खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केलाय. या खटल्यात आता या दोघांना जामीन मंजूर झालाय. मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने प्रत्येकी 15,000 रुपयांचा जामीन मंजूर केला.

दोघेही न्यायालयात हजर झाले : संजय राऊत आणि उद्धव ठाकरे आज सोमवारी (21 ऑगस्ट) न्यायालयात हजर झाले. संजय राऊत न्यायालयात प्रत्यक्ष हजर झाले, तर उद्धव ठाकरे यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर राहण्याची परवानगी देण्यात आली होती. न्यायालयात त्यांनी दोषी नसल्याचे सांगितले. या प्रकरणी पुढील सुनावणी 14 सप्टेंबर रोजी होणार आहे.

काय आहे प्रकरण : शिवसेनेच्या 'सामना' मुखपत्रातून खासदार राहुल शेवाळे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. 'सामना'तील 29 डिसेंबर 2022 च्या अंकामध्ये, 'शेवाळे यांचा पाकिस्तानमध्ये रियल इस्टेटचा व्यवसाय असून त्यात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे', असे म्हटले होते. यानंतर राहुल शेवाळी यांनी या प्रकरणी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केलाय.

शिंदे गटात गेल्यानंतर आरोप केला : राहुल शेवाळे हे सध्या शिवसेच्या शिंदे गटाचे खासदार आहेत. या आधी ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये होते. मात्र शिंदे गटात गेल्यानंतर त्यांच्यावर ठाकरे गटातील नेत्यांकडून आरोप सुरू झाले. 'सामना'तून करण्यात आलेले आरोप व्यक्तिशः राहुल शेवाळे यांची बदनामी करणारे आहेत, असे म्हणत त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात खटला दाखल केलाय.

'सामना'च्या वतीने उत्तर देण्यात आले होते : या प्रकरणी शेवाळे यांनी 3 जानेवारी 2023 रोजी त्यांच्या वकिलांमार्फत नोटीस पाठवली होती. त्याला 'सामना'च्या वतीने उत्तर देण्यात आले होते. 'इंटरनेटवर या संदर्भात चर्चा करणाऱ्या एका महिलेकडून ही माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे हा लेख प्रकाशित केला होता', असे या उत्तरात म्हटले होते. मात्र या उत्तराने समाधान न झाल्याने राहुल शेवाळे यांनी मुंबई दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी मानहानीची तक्रार दाखल केली.

हेही वाचा :

  1. Summons Against Thackeray And Raut : उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना 'या प्रकरणी' 31 जुलै रोजी कोर्टात हजर राहण्याचे समन्स जारी
  2. Rahul Shewale Defamation Case : खासदार राहुल शेवाळे बदनामी प्रकरण; उद्धव ठाकरे, संजय राऊतांना न्यायालयाचा समन्स
  3. MP Rahul Shewale On UCC: समान नागरी कायद्यासाठी विधानसभेने ठराव संमत करावा - खासदार राहुल शेवाळे
Last Updated : Aug 21, 2023, 5:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details