महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यातील जिम सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक - मुख्यमंत्री - gym owners meeting with cm

मुंबईतील जिम चालकांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी जिम चालकांनी एकत्र येऊन मार्गदर्शक तत्वे तयार करावीत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. मार्गदर्शक तत्वे आणि अटी शर्तींवर जिम सुरु करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

uddhav thackeray
उद्धव ठाकरे

By

Published : Aug 28, 2020, 8:37 PM IST

मुंबई- राज्यातील जिम सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. जिमच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी जिम मालकांनी मार्गदर्शक तत्वे शासनास सादर करावीत. त्याआधारे जिम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल,असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुंबईतील जिम मालक आणि चालकांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

जिम सुरू करताना कोरोनाचा प्रसार रोखणे हे मोठे आव्हान असणार आहे. यासाठी सर्व जिम चालकांनी एकत्र येऊन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही मार्गदर्शक तत्वे ठरवणे आवश्यक आहेत. ही तत्वे राज्यातील जिम चालकांनी एकत्रितपणे ठरवून शासनास सादर केल्यास त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लवकरच केंद्र सरकार अनलॉकच्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना जाहीर करणार आहे. त्यानंतर राज्य सरकार देखील मिशन बिगीन अगेन 4 घोषित करेल. यामध्येच जिम सुरु करण्याबाबत मार्गदर्शक सूचना असतील, अशी सूत्रांची माहिती आहे.

हेही वाचा-पावसामुळे काँग्रेसने आटोपते घेतले जेईई, नीट परीक्षा विरोधातील आंदोलन

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय महेता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबईतील जिम चालकांचे प्रतिनिधी महेश गायकवाड, निखिल राजपुरिया, करन तलरेजा, हेमंत दुधवडकर, गुरुजितसिंग गांधी, योगिनी पाटील, साईनाथ दुर्गे, रमेश गजरीया, मनोज पाटील उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details