मुंबई- मेट्रो कारशेडसाठी आरेतील २ हजार ७०० झाडे तोडण्यावर मुंबई मेट्रो रेल प्राधिकरण व भाजप सरकार ठाम आहे. मात्र, शिवसेनेने याला सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. आरेतील कारशेडसाठी भाजपने हट्ट केल्यास जे नाणारच झाल तेच आरेच होईल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
जैतापूर येथील नाणार प्रकल्पाला विरोध असतानाही भाजपने तेथे प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, शिवसेनेने त्याला विरोध करत नाणार प्रकल्प रद्द केला. तसाच आरेतील कारशेड प्रकल्पही रद्द होईल, असे उध्दव यांनी आरेप्रकरणी भाजप सरकारला टोला लगावला.