मुंबई : मिशन 2024 च्या पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी यांची भेट आज घेतली आहे. उद्या ते मुंबईत येणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात विरोधी पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मजबूत आघाडी बनवण्याचा विरोधकांनी रणनिती आखली आहे. देशभरातील सर्वच प्रादेशिक पक्षातील नेते, विरोधक यासाठी एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. मागील आठवड्यात बिहार विधान परिषदेचे सभापती देवेशचंद्र ठाकूर यांनी ठाकरेंची भेट घेतली होती. आता येत्या ११ मे रोजी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची यावेळी भेट घेतील. त्यांच्यासोबत सभापती ठाकूर, बिहार सरकारचे मंत्री संजय कुमार झा देखील उपस्थित असणार आहेत.
Nitish Kumar Mumbai Visit: नितीश कुमार उद्या मुंबईत घेणार उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची भेट; राजकीय वर्तुळाचे वेधले लक्ष - Nitish Kumar will meet Uddhav Thackeray
राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल जवळ आला आहे. त्यामुळे राज्यासह देशात राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय नेते नितीश कुमार गुरुवारी 11 मे 2023 रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे प्रणेते, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेणार आहेत. राजकीय वर्तुळाचे या भेटीकडे लक्ष लागले आहे.
राजकीय विषयांवर चर्चा :देशात भाजपला शह देण्यासाठी विरोधी पक्षांचे एकमत असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आणि विरोधकांच्या ऐक्यासाठी नीतीश कुमार देशभरात विरोधी पक्ष नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. नुकतेच काँग्रेस नेते राहुल गांधी, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या भेटी घेतली होती. उद्या 11 मे रोजी उद्धव ठाकरेंची मातोश्री या निवासस्थानी नितीश कुमार भेट घेतील, अशी माहिती जदयूचे राष्ट्रीय महासचिव आमदार कपिल पाटील यांनी दिली. नितीश कुमार यांना उद्धव ठाकरे यांनी स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले आहे. मातोश्रीच्या भेटीनंतर नितीश कुमार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानी जाऊन भेट घेतील. या भेटीवेळी राजकीय विषयांवर चर्चा करणार आहेत.
नितीश कुमार यांची वेगळी छाप :मुंबई विमानतळावर जनता दल युनायटेडच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत नितीश कुमार यांचे आमदार कपिल पाटील स्वागत करतील. त्यानंतर कलानगरच्या चौकात जदयू च्या कार्यकर्त्यांकडून नितीश कुमार यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. नितीश कुमार यांची बिहारचे मुख्यमंत्री म्हणून स्वच्छ प्रतिमा स्वच्छ आहे. सुशासन आणि संयमी नेतृत्व म्हणून ते नावलौकिक आहेत. बिहारचा कायापालट, महिलांच्याबाबत सुरक्षित धोरण आणि तरुणांना रोजगार उपलब्ध करुन आशा दिली आहे. मुंबई दौरा देखील त्यांचा आता ऐतिहासिक ठरणार असून देशाच्या राजकारणाला वेगळे राजकीय वळण मिळेल, असे कपिल पाटील यांनी सांगितले.
- हेही वाचा : Nitish Kumar meets Naveen Patnaik : नितीश कुमार यांनी घेतली ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची भेट
- हेही वाचा : Nitish Kumar News : नितीश कुमार येणार मुंबईच्या दौऱ्यावर... शरद पवारांसह उद्धव ठाकरेंची भेट घेणार
- हेही वाचा : Asaduddin Owaisi Attack On Nitish Kumar : दलित अधिकाऱ्याच्या खुन्याला सोडल्याचे सांगणार का, नितीश कुमारांना ओवेसींचा सवाल