मुंबई :केंद्र सरकार काश्मीरच्या मुद्द्यावर पूर्णपणे निष्फळ ठरले आहे. नुकताच आपण भारत जोडो यात्रेत सहभाग घेण्यासाठी काश्मीरमध्ये गेले होतो. तिथे काश्मीरमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून काश्मिरी पंडितांचे आंदोलन सुरू आहे. हजारो काश्मीर पंडितांची कुटुंब रस्त्यावर आंदोलन करत आहेत. आपण ज्यावेळेस तिथे पोहोचलो त्यावेळेस त्या काश्मिरी पंडितांनी "बाळासाहेब ठाकरे अमर रहे" अशा घोषणा दिल्या. आंदोलन करणारे हे सरकारी कर्मचारी आहेत. काश्मिरी खोऱ्यात गेल्यानंतर त्यांचे टार्गेट किलिंग केले जात आहे. आंदोलन करणाऱ्या काश्मिरी पंडितांची केवळ एवढीच मागणी आहे की, आम्ही जम्मूत राहतो म्हणून आमचे ट्रान्सफर जम्मूत करण्यात यावेत. मात्र त्यांची एवढी साधी मागणीदेखील केंद्र सरकार पूर्ण करत नाही. उलट गेल्या सहा महिन्यांपासून या सर्व कर्मचाऱ्यांचे पगार बंद करण्यात आलेले आहेत. जे सरकारी निवासस्थान होती ती, रिकामी करण्यात आली आहेत. मग कश्मीरी पंडितांबाबत केंद्र सरकारची ही भूमिका असेल तर त्यांनी हिंदुत्वाचे नारे देऊ नयेत. ही सर्व परिस्थिती आपण मुंबईत आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही सांगितले.
संजय राऊत यांचे जोरदार भाषण :बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने शिवसेना नेत्यांचा मेळावा आज सायन येथील षमुखानंद हॉल येथे पार पडला. यावेळी संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटावर टीकेची जोड उठवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई द्वारा असताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात आपण जाऊ चला इकॉनोमिक फोरमच्या समिटला गेल्यानंतर आपल्याला काही विदेशातले राष्ट्राध्यक्ष भेटले. त्यांनी देखील आपण मोदी भक्त आहोत असे म्हटले होते. या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. आज आपल्याला शिवसेना मेळाव्याच्या बाहेर चार गोरे लोक दिसली तेही वेगवेगळ्या देशातली होती. ते आपल्याला म्हणाले की, आपण आज उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकायला आलो आहोत, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.