मुंबईUddhav Thackeray : दसरा मेळाव्यानंतर ठाकरे गट व शिंदे गटात इंनकमिंग व आऊटगोईंग सुरु आहे. दसरा मेळाव्याच्या दोन दिवस आधी ठाकरे गटातील पदाधिकारी मीनाताई कांबळीसह (Meenatai Kambli) शेकोडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मात्र यानंतर दोनच दिवसांत भाजपातील माजी प्रवक्ते एकनाथ पवार (Eknath Pawar) यांनी शेकोडो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच ठाकरे गटात पदाधिकारी विस्तार केला होता. मात्र आता पुन्हा एकाद ठाकरे गटात पदाधिकारी तसेच विभागप्रमुखपदी विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. याला दोन महत्त्वाची कारणे आहेत.
अनिल परब व सुनील प्रभूंच्या जागी कोण? : मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटात काही दिवसांपूर्वी नेतेपदी आमदार अनिल परब (Anil Parab) व सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांच्याकडे असलेला विभागप्रमुख पदाचा अतिरिक्त भार कमी करण्याच्या हालचाली मातोश्रीतून सुरू झाल्या असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, अनिल परब व सुनील प्रभूंच्या जागी विभागप्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार यावर चर्चांना उधाण आलं आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि मनपा निवडणुकीच्या तोंडावर मोर्चेबांधणीसाठी आणि पक्षबांधणीसाठी विभागप्रमुखांच्या नव्या नियुक्त्या केल्या जाणार असल्याचे समजते. यामुळं लोकांशी ज्यांचा चांगला संपर्क असलेल्यांना विभागप्रमुख पदासाठी संधी मिळणार असल्याचं बोललं जातंय. यामुळं विभागप्रमुख पदासाठी काहींची नावे चर्चेत असून, काहींनी मोर्चेंबाधणीसाठी मातोश्रीवर गर्दी करायला सुरुवात केली असून, काही नावे समोर आल्याची माहिती देखील समोर आली आहेत.