महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेच्या प्रचार सभांना रविवारपासून सुरुवात; मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात धडाडणार उद्धव ठाकरेंची तोफ - satara

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उद्धव ठाकरेंच्या प्रचार सभांचे वेळापत्रक जाहीर.... ७ एप्रिल ते २७ एप्रिल या काळात मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये होणार ठाकरेंच्या सभा.... शिरुर- सातारा- मावळमध्येही धडाडणार ठाकरेंची तोफ

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे

By

Published : Apr 6, 2019, 4:44 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. शिवसेनेनेही २३ उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. ७ एप्रिल ते २७ एप्रिल या काळात मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.


मुंबईत ९ एप्रिलला दक्षिण मुंबईत अरविंद सावंत, १६ एप्रिलला उत्तर पश्चिम मुंबईत गजानन कीर्तीकर यांच्या लोकसभा मतदार संघात जाहीर सभा घेण्यात येतील. शिवसेना-भाजपची युती झाली असली तरी महाआघाडी एकत्र आल्याने शिवसेनेने आपले उमेदवार जिंकून येण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, शिरुर, सातारा, मावळ या ठिकाणी राष्ट्रवादी विरोधात शिवसेनेचे उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात कांटे की टक्कर पाहायला मिळणार असून उद्धव ठाकरे या तिन्ही ठिकाणी सभा घेणार आहेत.


रामटेक लोकसभेतील कमलेश्वर येथे ७ एप्रिलला सकाळी ११ वाजता आणि कन्हान, नागपूर येथे सायंकाळी ६ वाजता पहिली जाहीर सभा होईल. तर ८ एप्रिलला यवतमाळमध्ये सभा पार पडणार आहेत.


मतदारसंघ-निहाय होणाऱ्या सभांचे वेळापत्रक-

  • ११- एप्रिल - रायगड लोकसभेत गुहागर येथे जाहीर सभा
  • ११ एप्रिल - हातकणंगले, सायंकाळी ६ वाजता
  • १२ एप्रिल- बुलढाणा , लोकसभा
  • १३ एप्रिल - हिंगोली सायंकाळी ६ वाजता
  • १४ एप्रिल- धाराशिव सायंकाळी ६ वाजता
  • १५ एप्रिल - परभणी सायंकाळी ६ वाजता
  • १६ एप्रिल - अमरावती दुपारी ३ वाजता
  • १७ एप्रिल - रायगड, दुपारी ३ वाजता
  • १८ एप्रिल - रत्नागिरीत देवरुख दुपारी १२ वाजता
  • १८ एप्रिल - कणकवली कुडाळ सायंकाळी ५ वाजता
  • १९ एप्रिल - संभाजीनगर सायंकाळी ६ वाजता
  • २० एप्रिल - हातकंगणले सायंकाळी ६ वाजता
  • २१ एप्रिल - सातारा दुपारी ३ वाजता
  • २२ एप्रिल - शिर्डी सायंकाळी ६ वाजता
  • २३ एप्रिल - कल्याण सायंकाळी ६ वाजता
  • २३ एप्रिल - ठाणे रात्री ८ वाजता
  • २४ एप्रिल - नाशिक सायंकाळी ६ वाजता
  • २५ एप्रिल - शिरूर सायंकाळी ५ वाजता
  • २५ एप्रिल - मावळ सायंकाळी ८ वाजता
  • २६ एप्रिल - बिकेसीत
  • २७ एप्रिलला शेवटची सभा पालघर मध्ये पार पडणार

ABOUT THE AUTHOR

...view details