महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Uddhav Thackeray : कंत्राटदारांचे लाड करायचे आणि प्रसाद खायचा; उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा - ठाकरेंनी शिंदे गटाला खडसावले

कंत्राटदारांचे लाड करायचे आणि प्रसाद खायचा, सरकारची भूमिका असल्याचे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार निशाणा लगावला. प्रत्येकाचे दिवस असतात, आपणही सत्तेत आल्यावर आयुष्यभर लक्षात राहतील असा प्रसाद देऊ असा चिमटा भाजप आणि शिंदे गटाला काढला. भारतीय कामगार सेनेच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

Uddhav Thackeray News
उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा

By

Published : Apr 27, 2023, 7:22 PM IST

मुंबई :शिवसेनेची 56 वर्षे पूर्ण झाली तर भारतीय कामगार सेनेला 55 वर्षे पूर्ण झाली. 55 वर्षानंतर ही आपली भारतीय कामगार सेना तरुण आहे. दत्ताजी साळवीं सारखे निष्ठावंत लोक या संघटनेला लाभली. दत्ताजी साळवींची भाषणे जाणे ऐकली त्यांनाच ते माहित होते. त्या काळात युनियन कोणाची यावरून वाद निर्माण व्हायचे. आता संघटनांवरून मारामाऱ्या संपल्या, उलट सरकारच युनियन संपवायला निघाला असून खाजगीकरणाला पाठिंबा देत आहे. हा पायंडा घातक आहे. सरकार कंत्राटदारांचे लाड करत असून प्रसाद खायचे काम करत आहे, प्रत्येकाचे दिवस असतात. आपले दिवस गेले असे, मी म्हणणार नाही. आपण ते पुन्हा आणू आणि त्या वेळेला आयुष्यभर लक्षात राहील असा प्रसाद देऊ असा टोला भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना अप्रत्यक्षपणे लगावला.



भूमिपुत्रांवर अन्याय करणारे उद्योगधंदे: जय जवान जय किसानला शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी जोड दिली होती. कामगार देश घडवतात. युतीचे सरकार असताना शिवसेनाप्रमुख म्हणाले होते मोर्चे येथील परंतु मोर्चा आल्यावर पोलिसांमार्फत त्यांना अडवायचे नाही, ज्या खात्याबद्दल मोर्चा असेल त्या खात्याचा मंत्र्याने मंत्रालयाखाली येऊन मोर्चाला सामोरे जावे. आता ही संवेदनशीलता राहिलेली नाही, असे ठाकरे म्हणाले. 60 टक्के कामगार संघटित आणि उर्वरित असंघटित आहेत. घरात चूल पेटवण्यासाठी उद्योगधंदे आहेत. मागील अडीच वर्षाच्या सत्ता काळात 25 मोठे उद्योग आणि अडीच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणली. त्यातील बरेचसे प्रकल्प काहींनी पळवून आणि ओरबटून नेले. तरी काही जण बाळासाहेबांचे विचार दाखवत असल्याचे सांगत शेपट्या घालून बसले आहेत. भूमिपुत्रांच्या न्यायकासाठी शिवसेनेचा जन्म झाला. मात्र आज भूमिपुत्रांवर अन्याय करणारे उद्योगधंदे आणले जात आहेत. हे कसले बाळासाहेबांचे विचार, अशा शब्दांत ठाकरेंनी शिंदे गटाला खडसावले.




पाठीत वार करून सरकार पाडलं: तैवानच्या एका कंपनीसोबत सध्याचे उद्योग मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी करार केला. 2300 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार म्हणून फोटो काढले. ती जोडे बनवणारी कंपनी देखील तामिळनाडूत गेली. हे फक्त सरकार जोडे पुसण्याच्या लायकीचे असून महाराष्ट्राचे काय होणार, अशी भीती ठाकरेंनी व्यक्त केली. पाठीत वार करून सरकार पाडले, त्याचा बदला घ्यायचा आणि तो मी घेणारच, असा निर्धारित ठाकरेंनी यावेळी केला. शिवसेना खासदार अरविंद सावंत मंत्री असताना शेतकरी विरोधी काळा कायदा आणला. त्याला विरोध तीव्र विरोध केला. अरविंद सावंत यांना राजीनामा देण्यासाठी सांगितले असता तात्काळ पद सोडले. राजीनामा का आणि कशासाठी द्यायचा, एवढी साधी विचारपूस देखील केली नाही. असे निष्ठावंत लोक बाळासाहेबांनी घडवली आणि आज ते माझ्यासोबत आहेत, असे ठाकरे म्हणाले.




उद्धव ठाकरे यांचा इशारा: सध्या केंद्रातील सरकार न्यायव्यवस्था देखील अंमलाखाली घ्यायचा प्रयत्न करत आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती कडक असल्याने काही चालत नाही. आज अनेक प्रकारे प्रलोभने दाखवली जात आहेत. ती काही काळासाठी असतील. परंतु, निष्ठावंत शिवसैनिक आजही माझ्यासोबत आहेत. असल्या प्रलोभनाला बळी पडत नाहीत. तसेच शिवसेनेवर ज्या पद्धतीने अन्याय होतोय तो जाळून टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. दरम्यान, काही गद्दारी करून इकडे तिकडे पळायचा प्रयत्न करत आहेत. मात्र उद्योग बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत मावळे कुठेही गेलेले नाहीत. एकदा आज्ञा आली की, तिचे पालन करणाराच खरा शिवसैनिक असल्याची शिकवण बाळासाहेबांनी दिल्याचे सांगत भारतीय कामगार सेनेच्या कार्याबाबत विस्तृतपणे माहिती दिली. तर कामगार कायद्यांच्या आडून कामगारांची गळचेपी करणाऱ्यांना एकदा दणका देण्यासाठी आदेश द्या, अशी विनंती आमदार सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे यांना केली. शिवसैनिकांनी यानंतर जोरदार घोषणाबाजी करत सभागृह सोडले.

हेही वाचा:Uddhav Thackeray On Barsu Refinery बारसूबाबत पत्रावर उद्धव ठाकरेंनी सोडले मौन

ABOUT THE AUTHOR

...view details