महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Uddhav Thackeray : समाजवादी परिवार अन् शिवसेना एकत्र; उद्धव ठाकरेंचा भाजपासह 'आरएसएस'वर हल्लाबोल - MIG Club Mumbai

Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गट (Thackeray Group) आणि समाजवादी (Samajwadi Party) परिवाराची संयुक्त बैठक रविवार पार पडली. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाजपावर निशाणा साधला. तसेच त्यांना यावेळी महात्मा फुले यांची पगडी घालण्यात आली. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, महात्मा फुलेंची पगडी घालण्यासाठी तितकं मोठं डोकं लागतं, मी तितका मोठा नाही.

Uddhav Thackeray On BJP
उद्धव ठाकरे

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 15, 2023, 8:18 PM IST

Updated : Oct 15, 2023, 10:31 PM IST

मुंबई : Uddhav Thackeray : सध्याच्या राजकीय घडामोडीवर अनेक वर्षानंतर शिवसेना ठाकरे गट आणि समाजवादी पक्षाची संयुक्त बैठक (Samajwadi Party) मुंबईतील 'एमआयजी' क्लबमध्ये (MIG Club Mumbai) पार पडली. याप्रसंगी जयप्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया, एस एम जोशी, साने गुरुजी यांच्या विचारांचे महाराष्ट्रातील समाजवादी जनता परिवारातील अनेक नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत युतीविषयी भाष्य केलं. शिवसेना व समाजवादी पक्ष अनेक वर्षानंतर एकत्र येणं ही काळाची गरज असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी भाजपावरसुद्धा निशाणा साधलाय.

लाडके माजी मुख्यमंत्री म्हणत नाही : जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय महासचिव, विधान परिषदेचे आमदार कपिल पाटील यांच्या पुढाकारानं समाजवादी जनता परिवारातील नेते, कार्यकर्ते व उद्धव ठाकरे यांची एकत्र बैठक रविवारी मुंबईत आयोजित करण्यात आली होती. राज्यभरातील एकूण २१ जन चळवळीतील कामगार व पक्ष संघटनांच्या जवळपास १५० प्रतिनिधींनी या बैठकीला हजेरी लावली होती. याप्रसंगी उद्धव ठाकरे यांचा सत्कार करताना त्यांना महात्मा फुले यांची पगडी घालण्यात आली. यावर बोलताना ठाकरे म्हणाले की, महात्मा फुलेंची पगडी घालण्यासाठी तितकं मोठं डोकं लागतं, पण मी तितका मोठा नाही. हल्ली लोक काहीही घालतात. डोकं आहे की नाही माहिती नाही. त्यामुळे ती माझ्या डोक्यावर नको तर माझ्या हातात द्या. मी मुख्यमंत्री असताना सर्वांचा लाडका होतो. पण आता कोणीही मला लाडके माजी मुख्यमंत्री असं म्हणत नाही.

तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय? : यापूर्वी प्रबोधनकार ठाकरे आणि समाजवादी चळवळीच्या नेत्यांचा वैचारिक सलोखा राहिला आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी यापूर्वीही वैचारिक मतभेद होऊनसुद्धा समाजवादी नेत्यांशी मैत्री जपली होती. याचीही आठवण उद्धव ठाकरे यांनी याप्रसंगी करून दिली. ते म्हणाले, आम्ही पोटनिवडणूक जिंकलो तेव्हा भाजपानं हिंदुत्व म्हणून एकत्र आलो. परंतु सत्ता नसताना देखील जे एकत्र येतात ते चिरकाल टिकतात. जर मी समाजवादी पक्षासोबत आहे, तर तुमच्या पोटात दुखण्याचे कारण काय? या पक्षामध्ये मुस्लिम देखील आहेत. पण हे सर्व देशावर प्रेम करणारे आहेत. तुम्ही गुजरातमध्ये पाकिस्तानी संघावर फुलांचा वर्षाव करू शकता, मग आम्ही समाजवादी पक्षासोबत आलो तर तुम्हाला अडचण काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी याप्रसंगी सत्ताधाऱ्यांना विचारला. तसेच 'लढाई ही नेहमी विचारांशी असते, माणसांशी नाही, असं ठणकावत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला.

संघ कुठे होता? :मुंबई महानगरपालिका निवडणुकीत १९६८ साली समाजवादी आणि शिवसेना यांनी एकत्र युती करून प्रभावी काम केलं होतं. आता कित्येक दशकानंतर शिवसेना आणि समाजवादी जनता परिवार हे पुन्हा एकदा एक दिलानं एकत्र येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी आपल्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांनी संघावरसुद्धा निशाणा साधला. यावेळी बोलतना त्यांनी म्हटलं की, स्वातंत्र्याची चळवळ झाली तसेच, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली तेव्हा संघ कुठे होता? पण त्यावेळी जनसंघ मात्र होता. तेव्हा जनसंघानं देखील संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सहभाग घेतला. हे विसरून चालणार नाही. पण काहींना त्याचा विसर पडला आहे.

देश नक्की सुधारता येईल : उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मागे एका व्यक्तीनं ज्या बोटानं भाजपाला मत दिलं होतं, तेच बोट त्यानं कापलं. कारण त्याचा भ्रमनिरास झाला होता. मी कुणाच्या हातात माझ्या देशाचं भविष्य दिलं, अशामुळे हा त्याचाच नाही तर संपूर्ण देशाचा भ्रमनिरास झाला आहे. भाजपावरून लोकांचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे आता लोकांनी ठरवलं तर आपल्याला हा देश नक्की सुधारता येईल. त्यामुळे तुम्ही जर तेव्हा आणि आजही शिवसेनेसोबत उभं राहिला असता तर, आज महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद जास्त झाली असती.

हेही वाचा -

Nitesh Rane : ...तर उद्धव ठाकरेंना जबाबदार ठरवायचं का? नितेश राणेंचा संजय राऊतांना सवाल

Shivsena President :.., तर मराठी माणसाला न्याय मिळाला असता; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं विधान

Uddhav Thackeray vs Eknath Shinde : शिवसेना आमदार अपात्र प्रकरण ; 20 तारखेला होणार पुढील सुनावणी, आमदार म्हणाले . . .

Last Updated : Oct 15, 2023, 10:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details