मुंबई - स्वातंत्रवीर सावरकरांना कायर म्हणणाऱ्या राहुल गांधींची जीभ हासडली पाहिजे. देशासाठी बलिदान देणाऱ्यांना कायर म्हणणारे गांधी म्हणजे 'नालायक कार्ट' आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते आज दक्षिण मुंबई मतदार संघात सेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचार सभेत बोलत होते.
सावरकरांना कायर म्हणणाऱ्या राहुल गांधींची जीभ हासडली पाहिजे- उद्धव ठाकरे - अरविंद सावंत
सावरकरांना कायर म्हणणाऱ्या राहुल गांधींची जीभ हासडली पाहिजे, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केले आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमात सावरकरांना कायर म्हटले होते. या प्रसंगाची ध्वनी चित्रफित ठाकरे यांनी या सभेत दाखवली. सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगात देशासाठी अतोनात यातना भोगल्या, त्यांचे बंधूही त्याच तुरूंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते. देशासाठी बलिदान देणाऱ्यांना कायर म्हणणारे गांधी हे नालायक कार्ट आहे, या शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.
राहुल गांधी यांनी नेहरू आणि गांधी कुटुंबियांच्या नावावर मत मागावित, पण सावरकरांवर काहीही बरळू नये, असा इशाराही त्यांनी दिला. या सभेला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, आमदार राज पुरोहित, मंगलप्रभात लोढा आणि भाजप प्रवक्ते मधू चव्हाण उपस्तिथ होते.