मुंबई- शिवसेना-भाजप युतीमध्ये मी तडजोड केली. मात्र, ही तडजोड महाराष्ट्रासाठी केली. पण विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात जास्त आमदार शिवसेनेचेच निवडून येणार, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी एका खासगी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा विश्वास व्यक्त केला आहे.
'युती'मध्ये तडजोड केली, पण महाराष्ट्रासाठी - उद्धव ठाकरे - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
काही जागांसाठी खळखळ करत बसण्यापेक्षा राज्याचे हित पाहणे महत्त्वाचे आहे. यावेळी शिवसेनेला सर्वात कमी जागा मिळाल्या, हे खरे आहे. मात्र, यावेळी शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडून येणार आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
उद्वव ठाकरे
हेही वाचा - अष्टमीनिमित्त मुंबईतल्या शितलादेवी मंदिर परिसर फुलला; भाविकांची दर्शनासाठी रेलचेल
यावेळी ठाकरे म्हणाले, काही जागांसाठी खळखळ करत बसण्यापेक्षा राज्याचे हित पाहणे महत्त्वाचे आहे. यावेळी शिवसेनेला सर्वात कमी जागा मिळाल्या, हे खरे आहे. मात्र, यावेळी शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडून येणार आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती वेगळी असल्याने भाजपने आपली अडचण समजून घ्या, अशी विनंती केली होती. ती विनंती आम्ही मान्य केली, असे ठाकरे यांनी सांगितले.
Last Updated : Oct 7, 2019, 12:17 AM IST