महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Politics : शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार; बैठकीत शिक्कामोर्तब - आज नव्या युतीच्या समिकरणाची नांदी

उद्धव ठाकरे आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar of vanchit ) यांची आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब झाले ( Alliance will be sealed in the meeting ) आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्यानंतर प्रथमच आंबेडकर आणि ठाकरे एकत्र येणार आहेत.

Thackeray and vanchit group
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

By

Published : Dec 5, 2022, 8:38 AM IST

Updated : Dec 5, 2022, 3:10 PM IST

मुंबई : उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांची ग्रँड हयातमध्ये बैठक सुरू होती. ती आता संपली आहे. यात एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. आता वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाली आहे. या बैठकीला सुभाष देसाई, अरविंद सावंत, अनिल देसाई हजर होते. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेले शिवसेना उद्धव ठाकरे गट ( Shiv Sena Uddhav Thackeray group )आणि वंचित एकत्र येणार का या प्रश्नावर आज पडदा पडला आहे.

उद्धव ठाकरे आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar of vanchit ) यांची आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब झाले ( Alliance will be sealed in the meeting ) आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्यानंतर प्रथमच आंबेडकर आणि ठाकरे एकत्र येणार आहेत.


एकमत होत नसल्याने युतीचा निर्णय लांबला : भाजपला सत्तेतून दूर करण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर शिवसेनेत दोन गट झाले. मात्र, अडीच वर्षानी बारा खासदार आणि चाळीस आमदारांनी एकाच वेळी ठाकरेंची साथ सोडली. अस्थिर झालेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अनेक घटकातून पाठिंबा मिळत आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही भाजप विरोधात मूठ आवळण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये येण्यास इच्छुक असल्याचे वारंवार स्पष्ट केले होते. अनेकदा आघाडीच्या नेत्यांकडे युतीबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत आंबेडकर यांना घेण्याबाबत एक मत होत नसल्याने युतीचा निर्णय लांबला होता. आज ठाकरे गट वंचितची युतीबाबतची ही पहिली अधिकृत बैठक असेल. उद्या दुपारी 12 वाजता, महालक्ष्मी फोर सिझन हॉटेलमध्ये ही बैठक होत आहे. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.



शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र होण्याची शक्यता : प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या संकेतस्थळाच्या उद्धाटन कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले होते. दोघांचे वैचारिक व्यासपीठ एकच असल्याचे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले होते. त्यामुळे शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र होण्याची शक्यता वर्तवली जात होती. आज यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.


बैठकीकडे सर्वच राजकीय वर्तुळाचे लक्ष : प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे घनिष्ठ सबंध होते. तब्बल पाच दशकांनंतर ठाकरे आणि आंबेडकर प्रथमच एकत्र येऊन युतीबाबत चर्चा करणार आहेत. ठाकरे आणि आंबेडकर यांची युती झाल्यास आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समीकरण बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Last Updated : Dec 5, 2022, 3:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details