मुंबई - शहरात आज दोन वेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये दोन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांत गटारात, खड्ड्यात पडून होणाऱ्या मृत्यूंच्या घटनेनंतर आता नदी आणि समुद्रात बुडून होणारे मृत्यू हे मुंबईकारांसाठी चिंतेचा विषय बनत आहे.
मुंबईत दोन जणांचा बुडून मृत्यू; वाढत्या घटनांमुळे मुंबईकर चिंतेत
मुंबईत दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यातील बोरिवली येथील नदीत एकाचा तर मालाड येथील आकसा बिचवर एकाचा बुडून मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहिती अनुसार, दुपारी 2.20 च्या सुमारास येथील नदीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. या व्यक्तीला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले असता, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 'संतोष बाळकृष्ण संडीम' असे 43 वर्षीय मृताचे नाव आहे. दुसऱ्या एका घटनेत मालाड मालवणी येथील आकसा बीचवर एक युवक बुडल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाला मिळाली. अग्निशमन दलाने त्या युवकाला जनकल्याण नगर रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केले असता त्या युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली. बाबू परिमल द्रविड असे या युवकाचे नाव असून तो 24 वर्षांचा आहे.