महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राणीच्या बागेत 'या' दोन नवीन पाहुण्यांचे आगमन

यात नर जातीचा बिबट्या दोन वर्षांचा असून मादी जातीचा बिबट्या तीन वर्षांचा आहे. नराचे नाव ड्रोगान व मादीचे नाव पिंटो असे आहे.

राणीच्या बागेत 'या' दोन नवीन पाहुण्यांचे आगमन

By

Published : May 2, 2019, 6:55 PM IST

मुंबई- भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात (राणीच्या बागेत) ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत दोन नवीन पाहुण्यांचे आगमन झाले आहे. बंगळुरू येथील पिलीकुला बायोलॉजीकल पार्क येथून दोन बिबटे राणीच्या बागेत दाखल झाले आहेत. यामुळे ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत भेट देणाऱ्या बच्चे कंपनीला या नवीन प्राण्यांचे दर्शन होणार आहे.

राणीच्या बागेत दोन नवीन पाहुण्यांचे आगमन

यात नर जातीचा बिबट्या दोन वर्षांचा असून मादी जातीचा बिबट्या तीन वर्षांचा आहे. नराचे नाव ड्रोगान व मादीचे नाव पिंटो असे आहे. या दोन बिबट्यांना आणण्यासाठी राणीच्या बागेतून ग्रे पॅरेट व अलेक्झांडर पॅरेट हे पिलीकुला प्राणी संग्रहालयाला भेट देण्यासाठी गेले होते.

राणीच्या बागेत मुंबईसह देश-विदेशातील पर्यटक दररोज हजारोंच्या संख्येने येत असतात. ऑगस्ट २०१७ मध्ये राणीबागेत पेंग्विन आल्यापासून या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. राणीच्या बागेचे सुधारण्याचे काम दोन-दोन टप्प्यात सुरू आहे.

या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात वाघ, आशियाई सिंह, बिबटय़ा, तरस, लांडगा, देशी अस्वल, कोल्हा, बाराशिंगा, काकर, चितळ, नीलगाय, चौशिंगा, काळवीट, लहान मांजर, सांबर, चितळ, काकर, असे देशी प्राणी आणले जाणार आहेत.

जग्वार, चित्ता, पांढरा सिंह, पाणघोडा, वॅलेबी, झेब्रा, जिराफ, मॅड्रिल मंकी, ओकापी, इमू, शहामृग, चिपांझी लेसर फ्लेमिंगो, रिंगटेल लेमूर, हे विदेशी प्राणीदेखील आणण्यात येणार आहेत. त्यामळे मुंबईकरांना लवकरचे हे सर्व प्राणी बघण्याची संधी मिळणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details