मुंबई - सीएसएमटी जवळील हिमालय पुल कोसळून महिना होत नाही त्यातच गुरुवारी नवी मुंबईतील वाशीमधील सागर विहार येथे पादचारी पुलाचा काही भाग कोसळला आहे. या घटनेत २ व्यक्ती जखमी असून त्यांना नवी मुंबई महापालिका रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मागील महिन्यात १४ मार्चला सीएसएमटी जवळील हिमालय पुल कोसळला होता. त्यानंतर मुंबईतील पादचारी पुलाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. पुन्हा गुरुवारी ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये पादचारी पुलाविषयी भीती निर्माण होत आहे.