महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यातील विविध जिल्ह्यांमधील व शहरांतील कोरोना घडामोडी एका क्लिकवर..

राज्यातील विविध जिल्ह्यांमधील कोरोना संदर्भातील बुधवारची सर्व माहिती...

maharashtra corona update
महाराष्ट्र कोरोना अपडेट

By

Published : Aug 13, 2020, 3:43 AM IST

रत्नागिरीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 2500 च्या उंबरठ्यावर; जिल्ह्यात 96 नवे पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी- जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या अडीच हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी 96 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2487 झाली आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरी - 25, दापोली- 13, कामथे- 21, गुहागर - 26, देवरुख - 5, लांजा - 1 जणाचा समावेश आहे.

दरम्यान, बुधवारी जिल्हा शासकीय रुग्णालय येथून 10, कोविड केअर सेंटर, घरडा 5, उपजिल्हा रुग्णालय कळबणी 2, उपजिल्हा रुग्णालय कामथे 2 अशा 19 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 1616 झाली आहे. तर सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 784 एवढी आहे.

आणखी चौघांचा मृत्यू

जिल्ह्यात आणखी 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रत्नागिरी तालुक्यातील कारवांचीवाडी येथील 53 वर्षीय महिला रुग्ण, शिवाजीनगर, रत्नागिरी येथील 68 वर्षीय महिला रुग्ण, पुर्णगड, रत्नागिरी येथील 61 वर्षीय रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. तसेच खेर्डी, चिपळूण येथील 86 वर्षीय रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या आता 87 झाली आहे.

जिल्ह्यात 201 ॲक्टिव्ह कटेंनमेंट झोन

जिल्ह्यात सध्या 201 ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 32 गावांमध्ये, दापोली मध्ये 12 गावांमध्ये, खेड मध्ये 42 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 5, चिपळूण तालुक्यात 95 गावांमध्ये,मंडणगड तालुक्यात 1 आणि राजापूर तालुक्यात 8, संगमेश्वर तालुक्यात 1, गुहागर तालुक्यात 5 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

----------------------

वाशिम जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या एक हजारांच्या पार; ४७ व्यक्ती कोरोनामुक्त

वाशिम- जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या एक हजारांच्या पार गेली आहे. वाशिम जिल्ह्यात एकूण 1005 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या 327 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर बुधवारी 47 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

वाशिम शहरातील ड्रीमलँड सिटी परिसरातील २, अल्लाडा प्लॉट ३, टिळक चौक २, गवळीपुरा ३, सोंडा येथील १, अनसिंग येथील १६, मंगरूळपीर शहरातील शिवाजी नगर परिसरातील १, सिद्धार्थ विद्यालय परिसरातील १, कवठळ येथील ४, शेलूबाजार येथील ४, शेंदूरजना मोरे येथील १, रिसोड शहरातील पठाणपुरा येथील २, हराळ येथील ३, कारंजा लाड येथील सिंधी कॅम्प येथील २, दिल्ली वेस परिसरातील १, शिक्षक कॉलनी परिसरातील १ व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला.

आणखी १६ कोरोनाबाधित

कारंजा लाड शहरातील माळीपुरा येथील १, हयातनगर येथील १, सोहळ येथील १, कामरगाव येथील १, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील १, शिरसाळा येथील ८, रिसोड तालुक्यातील गोहगाव येथील १, एकलासपूर येथील २ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे.

वाशिम जिल्हा सद्यस्थिती (आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांसह)

एकूण पॉझिटिव्ह -१०२१

ॲक्टिव्ह- ३२७

डिस्चार्ज -६७५

मृत्यू -१८ (+१)

----------------------

नागपुरात दिवसभरात ६२१ रुग्णांची नोंद; ३१२ रुग्णांची कोरोनावर मात

नागपूर-गेल्या आठ दिवसांपासून नागपूर शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येचा उद्रेक झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. मंगळवारी सर्वाधिक ९७७ रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर बुधवारी काही प्रमाणात रुग्ण संख्या कमी झाल्याचे बघायला मिळाले. दिवसभरात नागपुरात ६२१ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामुळे येथील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १०९८२ इतकी झाली आहे. यामध्ये १३० रुग्ण हे नागपूर जिल्ह्या बाहेरील आहेत.

नागपूरमधील एकूण रुग्ण संख्येपैकी ३३७३ रुग्ण नागपूर ग्रामीणच्या विविध तालुक्यातील असून ७६०९ रुग्ण नागपूर शहरातील आहेत. बुधवारी पॉझिटिव्ह आलेल्या ६२१ रुग्णांपैकी २०८ रुग्ण नागपूर ग्रामीण भागातील आहेत तर ४१३ रुग्ण हे शहराच्या विविध परिसरातील आहेत.

बुधवारी ३१२ कोरोना रुग्ण उपचारानंतर अगदी ठणठणीत बरे होऊन घरी देखील परतले आहेत. त्यामुळे नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५३२७ इतकी झाली आहे. या शिवाय आज २७ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे नागपुरात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा एकूण आकडा ४०० इतका झाला आहे. महत्वाचे म्हणजे ४०० पैकी ३३७ मृत्यू हे नागपुर जिल्ह्यातील आहेत तर इतर मृत्यू हे नागपूर जिल्ह्याच्या बाहेरील रुग्णांचे झाले आहेत. यामध्ये अमरावती आणि अकोला येथील कोरोनामुळे नागपुरात मृत्यू झालेल्या रुग्णांचा समावेश आहे.

सध्या नागपुरातील २८ ठिकाणी ५२५५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नागपुरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ४८.५० टक्के इतके आहे. तर एकूण मृत्यू दर हा ३.६४ इतका आहे. शिवाय मूळ नागपुरातील रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची टक्केवारी ३.०६ इतकी आहे

----------------------

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात २०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद ; २ मृत्यू

पालघर-जिल्ह्यातील ग्रामीण भागात बुधवारी कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. दिवसभरात २०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. २ कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे १२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आढळलेल्या २०० कोरोना रुग्णांपैकी सर्वाधिक १३० रुग्ण हे पालघर तालुक्यातील आहेत. त्याचबरोबर २० कोरोना रुग्ण डहाणू तालुक्यातील, १५ वाडा तालुक्यातील, ११ जव्हार तालुक्यातील, २ तलासरी तालुक्यातील, ३ विक्रमगड तालुक्यातील व १९ वसई ग्रामीण भागातील रुग्ण आहेत.

ग्रामीण भागात पालघर तालुक्यातील एक व डहाणू तालुक्यातील एक अशा एकूण दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार ७९३ इतकी झाली. आतापर्यंत ७९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ३ हजार ६५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. १०६० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

----------------------

धक्कादायक! हिंगोली जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले कोरोनाचे 79 रुग्ण

हिंगोली- जिल्हा प्रशासनास प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोनाचे 79 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 976 वर पोहोचली आहे. 292 कोरोनाबाधित रुग्णांवर विविध कोरोना केअर सेंटर तसेच कोरोना वार्ड मध्ये उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी दिली आहे.

नव्याने आढळलेल्या रुग्णांपैकी हिंगोली परिसरात 34 व्यक्ती, तर कळमनुरी परिसरात 11, वसमत परिसर 12 व्यक्ती, सेनगांव परिसर 05 असे एकूण 62 रुग्ण हे रॅपिड अँटिजेन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आले आहे. हिंगोली शहरातील तोफखाना भागात 4 व्यक्ती, रिसाला बाजार 4 व्यक्ती, महसूल कॉर्टर 03, पेन्शनपुरा 03 व्यक्ती, तलाबकट्टा 02 व्यक्ती, वसमत 01 व्यक्ती असे एकूण 17 रुग्ण आरटीपीसीआर टेस्टद्वारे आढळून आलेले आहेत. आनंदाची बाब म्हणजे बुधवारी 27 कोरोनाबाधित रुग्ण हे बरे झाल्याने त्यांना प्रशासनाच्या वतीने सुट्टी देण्यात आली.

सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोरोना रुग्णांपैकी 8 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. 3 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे, अशा एकूण 11 रुग्णांची सद्यस्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे एकूण 976 रुग्ण झाले असून, त्यापैकी 674 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात एकूण 292 रुग्णांवर विविध कोरोना केअर सेंटर अन कोरोना वार्ड मध्ये उपचार सुरु आहेत. तसेच कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 10 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक किशोर श्रीवास यांनी दिली आहे.

----------------------

वसई- विरारमध्ये 169 कोरोनाबाधित आढळले; उपचारांदरम्यान 5 रुग्णांचा मृत्यू

वसई-विरार(पालघर)-संपूर्ण वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. बुधवारी वसई-विरारमध्ये एका दिवसात 169 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

बुधवारी दिवसभरात उपचारादरम्यान 05 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 241 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 169 रुग्ण वाढल्यामुळे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 13 हजार 983 वर पोहोचली आहे.

वसई-विरारमध्ये आतापर्यंत एकूण 297 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. पालिका क्षेत्रात आतापर्यंत 10 हजार 937 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 2 हजार 749 कोरोनाबाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

----------------------

अकोल्यात 16 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; दोघांचा मृत्यू तर 14 जण कोरोनामुक्त

अकोला- कोरोना तपासणी अहवालात बुधवारी 16 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. 14 जणांनी कोरोनावर मात केली तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून रुग्णांच्या मृत्यूची संख्या सतत वाढत आहे.

16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात दोन महिला व १४ पुरुष आहेत. त्यातील केळकर हॉस्पिटल येथील दोन जण तर उर्वरित गिता नगर, कापसी, जीएमसी, मुर्तिजापूर, भिम नगर, निमकर्दा, मोठी उमरी, कौलखेड, कृषि नगर, निमकर्दा, जठारपेठ, सस्ती, कोठारी व वाघाडी वरखेड ता. बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान, मंगळवारी रात्री रॅपीड अँटिजेन टेस्टमध्ये सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्येत व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे.

दोन रुग्णांचा दिवसभरात मृत्यू झाला. एक रुग्ण वंजारीपुरा, बार्शीटाकळी येथील ५५ वर्षीय पुरुष असून तो ११ ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. आणखी एक रुग्ण मुर्तिजापूर येथील ४८ वर्षीय महिला असून ती १ ऑगस्ट रोजी दाखल झाली होती. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच जणांना, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील सात जण तर ऑयकॉन हॉस्पिटल येथून दोन जणांना अशा एकूण १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

बुधवारी प्राप्त अहवालाची स्थिती

प्राप्त अहवाल- ४५१

पॉझिटिव्ह- १६

निगेटिव्ह-४३५

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह अहवाल- २६२७+४९७=३१२४

मृत्यू-११९

डिस्चार्ज- २४५८

दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-५४७

----------------------

यवतमाळमध्ये 71 कोरोनाबाधित रुग्ण वाढले; 2 जणांचा मृत्यू

यवतमाळ- जिल्ह्यात बुधवारी नव्याने 71 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला. तसेच आयसोलेशन वॉर्ड आणि विविध कोविड सेंटरमध्ये भरती असलेले 31 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.मृत्यू झालेल्यांमध्ये दारव्हा शहरातील अंबिका नगर येथील 58 वर्षीय पुरुष आणि कळंब तालुक्यातील माठा येथील 49 वर्षीय पुरुष आहे.

नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 71 जणांमध्ये 44 पुरुष व 27 महिलांचा समावेश आहे. यात पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथील दोन महिला, नेर तालुक्यातील वळफळी येथील एक पुरुष, घारफळ येथील एक महिला, नेर शहरातील दोन महिला, यवतमाळ शहरातील शारदा चौक येथील पुरुष, दलित सोसायटी, पाटीपूरा येथील एक महिला, संजीवनी हॉस्पीटलच्या वसतीगृहातील दोन महिला, मोठे वडगाव शांती नगर येथील दोन पुरुष, यवतमाळ शहरातील पिंपळगाव येथील एक महिला, नेताजी नगर येथील एक पुरुष, रोहिनी सोसायटी येथील एक पुरुष, घाटंजी शहरातील एक पुरुष, महागाव तालुक्यातील बेलदरी येथील एक पुरुष, महागाव शहरातील तीन पुरुष व दोन महिला, पुसद शहरातील पाच पुरुष व दोन महिला, पुसद शहरातील बालाजी पार्क येथील एक पुरुष व एक महिला, शिवाजी वॉर्ड येथील एक पुरुष, सुरज पार्क येथील एक पुरुष, अग्रवाल ले-आऊट येथील दोन पुरुष व एक महिला, व्यंकटेश नगर येथील एक पुरुष व एक महिला, हनुमान वॉर्ड येथील एक पुरुष, पुसद तालुक्यातील घाटोडी येथील एक पुरुष, शेंबाळपिंपरी येथील एक पुरुष, इसापूर येथील एक पुरुष व एक महिला, उमरखेड शहरातील दोन पुरुष व दोन महिला, राळेगाव शहरातील एक पुरुष, दारव्हा येथील एक महिला, दारव्हा शहरातील जैन मंदीर रोड येथील एक पुरुष, डोलारी देवी येथील एक पुरुष, दारव्हा तालुक्यातील हतगाव येथील एक महिला, संगलवाडी येथील एक पुरुष, झरीजामणी शहरातील एक पुरुष, आंध्रप्रदेशातील आदिलाबाद येथील एक महिला, मानोरा ग्रामीण गाव्हा येथील एक पुरुष, दिग्रस शहरातील आरएनएक्स कॉम्प्लेक्स येथील एक पुरुष, अग्रवाल कॉम्प्लेक्स येथील एक पुरुष, कच्ची चौक येथील एक महिला, ताजनगर येथील एक पुरुष व एक महिला, पोलीस वसाहत येथील दोन पुरुष, शास्त्री नगर येथील एक पुरुष, भाटीपूरा येथील एक महिला, गजानन मेडीकल येथील एक पुरुष पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू आणि 'पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या 31 जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 626 आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1958 झाली आहे. यापैकी 1281 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 51 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 134 जण भरती आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 30652 नमुने पाठविले आहेत. यापैकी 29731 प्राप्त तर 921 अप्राप्त आहेत. तसेच 27773 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने सांगितले.

---------------------------

नांदेडमध्ये बुधवारी 99 कोरोनाबाधितांची भर; 3 जणांचा मृत्यू

नांदेड- बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या अहवालानुसार जिल्ह्यात 147 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 99 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 62 तर अँटिजेन किट्स तपासणीद्वारे 37 बाधित आले.

बुधवारच्या एकूण 610 अहवालांपैकी 491 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता 3 हजार 617 एवढी झाली असून यातील 2 हजार 56 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकूण 1 हजार 414 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 169 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.

10 ऑगस्ट रोजी देगलूर नाका नांदेड येथील 75 वर्षाचा एक पुरुष खाजगी रुग्णालयात, 12 ऑगस्ट रोजी किनवट तालुक्यातील लोणी येथील 60 वर्षाची एक महिला, लाईन गल्ली देगलूर येथील 50 वर्षाची एक महिला यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णूपुरी येथे उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींची संख्या 129 एवढी झाली आहे.

बुधवारी बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णूपूरी नांदेड येथील 2, नायगाव कोविड केअर सेंटर येथील 9, देगलूर कोविड केअर सेंटर 11, खाजगी रुग्णालय 8, बिलोली कोविड केअर सेंटर 4, भोकर कोविड केअर सेंटर 1, हदगाव कोविड केअर सेंटर 10, मुखेड काविड केअर सेंटर 17, पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड येथे 69,शासकीय आयुर्वेदिक महाकोविड केअर सेंटर 14, किनवट कोविड केअर सेंटर 1, औरंगाबाद येथील संदर्भित 1 अशा एकूण 147 जणांना कोरोनामुक्त झाल्यामुळे औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.

बुधावारी वाढलेल्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 18, लोहा तालुक्यात 1, नायगाव तालुक्यात 8, बिलोली तालुक्यात 1, कंधार तालुक्यात 1, दिल्ली 1, नांदेड ग्रामीण 4, मुखेड तालुक्यात 18, उमरी तालुक्यात 1, हदगाव तालुक्यात 5, धर्माबाद तालुक्यात 3, यवतमाळ 1 असे एकुण 62 बाधित आढळले.अँटिजेन तपासणीद्वारे मुखेड 6, भोकर तालुक्यात 3, मुदखेड तालुक्यात 11, धर्माबाद तालुक्यात 4, नांदेड ग्रामीण 3, देगलूर तालुक्यात 8, उमरी तालुक्यात 2 एकूण 37 बाधित आढळले.

जिल्ह्यात 1 हजार 414 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 179, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 483, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 40, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 54, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 31, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 122, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 105, लोहा कोविड केअर सेंटर येथे 13, हदगाव कोविड केअर सेंटर 44, भोकर कोविड केअर सेंटर 17, कंधार कोविड केअर सेंटर येथे 14, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 30, किनवट कोविड केअर सेंटर येथे 37, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 31, मुदखेड कोविड केअर सेटर 21, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 1, माहूर कोविड केअर सेंटर येथे 17, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 23, बारड कोविड केअर सेंटर 4, उमरी कोविड केअर सेंटर 5, खाजगी रुग्णालयात 137 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 4, निजामाबाद येथे 1, हैदराबाद येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

सर्वेक्षण- 1 लाख 50 हजार 123,

घेतलेले स्वॅब- 24 हजार 867,

निगेटिव्ह स्वॅब- 19 हजार 13,

बुधवारी पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 99,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 3 हजार 617,

बुधवारी स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 8,

बुधवारी स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 2,

एकूण मृत्यू संख्या- 129,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 2 हजार 56,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 414,

बुधवारी प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 741,

बुधवारी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 169.

---------------------------

दिलासादयक.... सांगलीत कोरोनामुक्त झालेल्यांची रेकॉर्ड ब्रेक संख्या; 280 रुग्णांची भर..

सांगली- जिल्ह्यामध्ये बुधवारी कोरोनामुक्त होणाऱ्या संख्येच्या रेकॉर्ड ची नोंद झाली. बुधवारी तब्बल 489 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सागंलीत 280 नव्या रुग्णांची भर पडली आहे.तर, अकरा जणांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 2,313 झाली आहे. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 5 हजार 270 वर पोहोचली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना बुधवारी सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.उपचार घेणारे तब्बल 489 रुग्ण हे दिवसभरात कोरोना मुक्त झाले आहेत.त्यांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देऊन इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन सेंटर मध्ये पाठवण्यात आले आहे.जिल्ह्यातील एकूण कोरोना रुंग्णींची संख्या5 हजारांच्या पुढे पोहोचली.

दुसऱ्या बाजूला कोरोना रुग्ण आणि मृत्यू संख्येत वाढ कायम आहे. बुधवारी दिवसभरात उपचार घेणाऱ्या 11 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहर 04 ,मिरज शहर 01, भोसे 1, कुपवाड 02, शिराळा -कोकरूड 1, खानापूर-धोंडगेवाडी 1,आणि पलूस-वसगडे येथील 1 व्यक्तींचा समावेश आहे. बुधवारी 280 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये मध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील संख्या अधिक आहे. मध्ये सांगली शहरातील 122 रुग्ण असून सांगली शहरातील 82 आणि मिरज शहरातील 40 जणांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बुधवारचे कोरोना रुग्ण

१) आटपाडी तालुका - 08

२) जत तालुका - 03

३) कवठे महाकांळ तालुका -17

४) मिरज तालुका - 36

५) पलुस तालुका - 07

६) वाळवा तालुका - 45

७) तासगांव तालुका -26

८) शिराळा तालुका - 09

९) कडेगाव तालुका - 12

१०) खानापूर तालुका- 04

कोरोना उपचार घेणारे 221 जण हे अतिदक्षता विभागात असून यामधील 147 जण हे ऑक्सिजनवर तर 47 जण हे नॉन इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर तर, हायफ्लो नेझुल ऑक्सिजनवर 01 आणि इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर 03 जण उपचार घेत आहेत.

जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 2,313 झाली आहे. जिल्ह्यात आता पर्यंत एकूण 5,270 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.यापैकी बुधवारपर्यंत 2,781 जण कोरोना मुक्त झाले आहेत. 167 जणांचा आता पर्यंत मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

------------------------

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा कहर थांबता थांबेना; नव्याने ३६८ रुग्णांची भर

कल्याण डोंबिवली(ठाणे)- महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर रोखण्यासाठी गेल्या तीन महिन्यापासून पालिका प्रशासन विविध उपाययोजना राबवत आहे. तरी देखील कोरोना रुग्ण वाढीचा वेग थांबता थांबेनसा झाला आहे. आतापर्यत कोरोनाबाधित रुग्णसंख्येने २३ हजारांचा टप्पा ओलांडला असून बुधवारी ३६८ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर ८ जणांचा कोरोनाच्या आजाराने मृत्यू झाला असून आतापर्यत ४६६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील विविध रुग्णालयातून २३२ जणांना गेल्या बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. ३६८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या २३ हजार २१७ च्या घरात पोहचली आहे. शहरात ४ हजार १९० कोरोनाबाधित रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु असून आतापर्यत १८ हजार ५६१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ४६६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजच्या ३६८ रूग्णांची संख्या पाहता कल्याण पूर्व -९०, कल्याण पश्चिम.-७२, डोंबिवली पूर्व-१०१, डोंबिवली प-५६, मांडा टिटवाळा ३१, मोहना येथील १६ तर पिसवली यथील २ रुग्णांचा समावेश आहे. २३२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्यापैकी १०७ रुग्ण टाटा आमंत्रा कोविड केयर सेंटर मधून, तर २२ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ५ रुग्ण बाज आर. आर. रूग्णालयामधून, ४ रुग्ण हॉलीक्रॉस रुग्णालयातून, ४ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून, ४ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details