महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आधी प्यायली दारू; मग गाड्या उडवल्या सात, रुही सिंगचा प्रताप - रुही सिंग

टीव्ही अभिनेत्री रुही शैलेशकुमार सिंग (वय ३०) हिने मद्यधुंदावस्थेत भरधाव कार चालवत ७ वाहनांना धडक आहे.

टीव्ही अभिनेत्री रुही शैलेशकुमार सिंग (वय ३०) हिने मद्यधुंदावस्थेत भरधाव कार चालवत ७ वाहनांना धडक आहे.

By

Published : Apr 2, 2019, 5:58 AM IST

Updated : Apr 2, 2019, 5:39 PM IST

मुंबई - टीव्ही सीरियल कलाकार रुही सिंग हिने मद्यपान केलेल्या अवस्थेत चारचाकी चालवत मंगळवारी पहाटे २.३० च्या दरम्यान रस्त्यावरील ७ वाहनांना ठोकर देत पळण्याचा प्रयत्न केला. खार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेत रस्त्यावर उभ्या अडलेल्या ३ चारचाकी वाहने, ४ मोटार सायकलचे नुकसान झाले आहे.

टीव्ही अभिनेत्री रुही सिंग हिने मद्यधुंदावस्थेत भरधाव कार चालवत ७ वाहनांना धडक आहे.

वाहनांना ठोकर दिल्यानंतर रुही सिंग हिने जागेवरून पळ काढला होता. मात्र, स्थानिक नागरिकांनी हिला तात्काळ अडवून ठेवले होते. यावेळी रुही सिंग हिने पोलीस व स्थानिक नागरिकांशी वाद घालण्यास सुरुवात केली. तसेच एका पोलीस अधिकाऱ्यांची वर्दीतील नेम प्लेट सुद्धा तिने हिसकावून घेतली होती. खार पोलीस ठाण्यात रुही सिंग व तिच्या २ मित्रांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Last Updated : Apr 2, 2019, 5:39 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details