मुंबई:जगात आणि भारतात देखील याबद्दल सर्वांना जाणीव आहे की क्षयरोग हा लवकर बरा होत नाही. लहान मुलांमध्ये क्षयरोग शोधणे हे मोठ्यांपेक्षा तुलनेने कठीण असते. कारण प्रौढ माणसांचा कफ जो आहे तो शरीराच्या बाहेर सहज पडतो. आणि त्याच्यातून नमुने चाचणी केल्यावर लक्षात येते की क्षयरोग आहे. परंतु लहान मुलांच्या संदर्भात ते होऊ शकत नाही. या अनुषंगानेच ह्या समस्येवर निदान करण्यासाठी मुंबईतील फाउंडेशन फॉर मेडिकल रिसर्च यांच्या संशोधकाच्या समूहाने बायोप्सी शिवाय वेगळी पद्धती वापरून एक चाचणी विकसित केली आहे. त्यामुळे आता लहान मुलांमधील क्षयरोग ओळखता येऊ शकतो. यासंदर्भात वैद्यकीय क्षेत्रातून स्वागत करण्यात आलेले आहे.
क्षयरोगाच्या निदानासाठी उपयोगी: कोरोना महामारीच्यानंतर या संस्थेने मुंबईत तीन भागात नॉन-इनव्हेन्सिव्ह मास्टर या पद्धतीने लहान मुलांमधील क्षयरोगाच्या संदर्भात प्राथमिक प्रकल्प राबवला होता. आणि त्यामधून त्यांनी शोध अभ्यास केला. आणि या पद्धतीमध्ये विकास घडवलेला आहे. कोरोना महामारीच्या काळामध्ये जो एन 95 मास्क वापरला जात होता. त्यामध्ये श्वासोच्छवासातील एरोसोल खेचून घेण्यासाठी आतील बाजूस जिलेटिन कव्हर असते. हे जे कव्हर आहे हे अच्छादन कोविड विषाणूचे देखील एअरसोल खेचून घेते. तसेच टीबी आजाराचे देखील विषाणू असो त्या संदर्भातील निदान करण्यासाठी या एयरसोलचा महत्त्वाचा उपयोग होऊ शकतो.
असा करण्यात आला प्रयोग: एकूण प्रायोगिक शोध अध्ययनामध्ये परळमधील वाडिया रुग्णालय, भायखळा मधील जे. जे. रुग्णालय आणि गोवंडी मधील डॉक्टर विकास ओसवाल यांचे केंद्र अशा तीन रुग्णालयांमध्ये सुमारे 50 बालकांना या प्राथमिक अध्ययनात सहभागी करून घेण्यात आले. या बालकांना सुधारित एन 95 प्रकारचे मास्क घालायला दिले होते. त्यानंतर दहा मिनिटे त्या बालकांना मास्क घालूनच बोलायला सांगितले होते आणि जर खोकला आला तर मास्क घालूनच खोका आणि त्यानंतर त्या मुलांच्या या मास्कच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यानंतर जो शोध आढळला त्यावर आता या मास्कमुळे लहान बालकांमधील क्षय रोगाचे निदान सहज ओळखता येऊ शकते, हे सिद्ध झाले.
क्षयरोगाचे निदान होते लवकर: प्रायोगिक तत्त्वावर या अध्ययन प्रकल्पामध्ये ज्या पद्धती वापरल्या गेल्या. त्यामधून गॅस्ट्रिक लव्हज किंवा थुंकीच्या नमुना मध्ये तपासणी करत असताना उपचार न केलेला रुग्णांमध्ये 75 टक्के प्रमाण तर विशिष्ट आजार असलेल्या मुलांमध्ये 95% प्रमाणाची पुष्टी यातून करता येते. त्यामुळे मुलांमधील टीबी आजार यामुळे लवकर ओळखता येऊ शकतो, असं मुख्य संशोधक डॉक्टर अंबरीन शेख यांनी म्हटले आहे. या संदर्भातले प्राथमिक अध्ययन केल्यानंतर त्या अभ्यासाचे निष्कर्ष इंटरनॅशनल जनरल ऑफ इन्फेक्शन ओपन इन सायंटिफिक रिपोर्ट या जनरलमध्ये प्रकाशित करण्यात आले. त्याच्यावर तज्ञांनी विविध मते देखील व्यक्त केली आणि या अभ्यास अध्ययनाला दुजोरा दिला.