महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वृक्ष छाटणीची परवानगी मिळणार ऑनलाईन.. महापालिकेने विकसित केले 'MCGM 24x7' अ‌ॅप - Tree pruning permission app news

पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या पूर्व परवानगीने आपल्या परिसरातील वाढलेल्या झाडांच्या फांद्या सुयोग्य व शास्त्रीय पद्धतीने पावसाळ्यापूर्वीच छाटाव्यात, असे आवाहन महापालिकेद्वारे करण्यात आले आहे.

वृक्ष छाटणीची परवानगी
वृक्ष छाटणीची परवानगी

By

Published : May 22, 2020, 12:11 PM IST

मुंबई - पावसाळ्यादरम्यान झाडे पडून वित्त व जीवितहानी होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता असते. हे लक्षात घेऊन सर्व संबंधितांनी महापालिकेच्या पूर्व परवानगीने आपल्या परिसरातील वाढलेल्या झाडांच्या फांद्या सुयोग्य व शास्त्रीय पद्धतीने पावसाळ्यापूर्वीच छाटाव्यात, असे आवाहन महापालिकेद्वारे करण्यात आले आहे. या अनुषंगाने आवश्यक ती परवानगी मिळण्यासाठीचा अर्ज पूर्वीप्रमाणेच महापालिकेच्या विभाग कार्यालयात स्वीकारण्यात येत आहे. पण, त्याचबरोबर नागरिकांना घर बसल्या वृक्ष छाटणी परवानगीसाठी अर्ज करण्याची सुविधा महापालिकेच्या 'MCGM 24x7' या अ‌ॅपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वर्ष २०१८ मध्ये झालेल्या वृक्ष गणनेनुसार महापालिका क्षेत्रात साधारणपणे २९ लाख ७५ हजार २८३ झाडे आहेत. यापैकी १५ लाख ६३ हजार ७०१ एवढी झाडे खाजगी आवारांमध्ये आहेत. तर, ११ लाख २५ हजार १८२ एवढी झाडे शासकीय परिसरांमध्ये आहेत. याव्यतिरिक्त १ लाख ८५ हजार ३३३ झाडे ही रस्त्यांच्या कडेला असून उर्वरित १ लाख १ हजार ६७ एवढी झाडे विविध उद्यानांमध्ये आहेत, अशी माहिती उद्यान खात्याद्वारे देण्यात आली आहे.

तर, पावसाळ्यापूर्वी मृत झालेल्या किंवा किडीचा प्रादुर्भाव असलेल्या झाडांबाबत अथवा धोकादायक झालेल्या झाडाबाबत देखील महापालिकेच्या १९१६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. याबाबत महापालिकेच्या विभाग कार्यालयातील कनिष्ठ वृक्ष अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधावा किंवा त्यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य ती कार्यवाही पावसाळ्यापूर्वी करवून घ्यावी, असेही आवाहन उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details