धडाका! राज्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या - mumbai news update
गृह विभागाकडून महाराष्ट्र राज्य पोलीस खात्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. हे बदल्यांचे आदेश शुक्रवारी रात्री काढण्यात आले.
मुंबई - राज्याच्या गृह विभागाकडून वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये सध्याचे एटीएसप्रमुख देवेन भारतीयांना अतिरिक्त पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळावर पाठवण्यात आले. तर, जयजित सिंग यांना एटीएसच्या प्रमुखपदी नेमण्यात आलेले आहे. याबरोबरच प्रभात कुमार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा कार्यभार देण्यात आला. नवल बजाज यांना ऍडिशनल डीजी म्हणून आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई येथे पाठवण्यात आलेला आहे.
निकेत कौशिक यांना सहपोलीस आयुक्त आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई या ठिकाणी पाठविण्यात आले असून संजय मोहिते यांना विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र, एम. के. भोसले विशेष पोलीस महानिरीक्षक मोटार परिवहन पुणे, राजवर्धन विशेष पोलीस महानिरीक्षक महिला अत्याचार प्रतिबंधक महाराष्ट्र राज्य या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे.
याबरोबरच प्रियांका नारनवरे यांना पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 पुणे शहर येथे पाठविण्यात आले असून पंकज देशमुख यांना पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 पुणे शहर या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहे. मंचक इप्पर पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 पिंपरी-चिंचवड, सुधीर हिरेमठ पोलीस उपायुक्त मुख्यालय पिंपरी-चिंचवड, पीएन कराड पोलीस उपायुक्त वाहतूक नवी मुंबई, आचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा शहर, समीर असलम शेख अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी गडचिरोली, सोमय्या विनायक मुंडे अपर पोलीस अधीक्षक अहेरी गडचिरोली व मुंमका सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक परभणी, याठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे.