मुंबई:मध्य रेल्वे यांनी छत्रपती शिवाजी महाराज टमिन्स प्लॉटफॉर्म क्रमांक १८ पी.डी. मेलो रोड, मुंबई येथे कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमास मुंबई तसेच इतर भागातून बरीच गर्दी होण्याची शक्यता आहे. पूर्व द्रुतगती मार्ग, पी.डीमेलो रोड, शहीद भगतसिंग रोड तसेच कार्यक्रमस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. म्हणून या परिसरातील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी आणि सर्वसाधारण जनतेची गैरसोय टाळण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पूर्व द्रुतगती मार्ग, पी.डीमेलो रोड, शहीद भगतसिंग रोड (सर्व बाजू रस्तेसह) वाहतूक नियमन आणि नियंत्रण करण्यात येईल. आज दुपारी 2.45 ते 4.15 वाजेपर्यंत या बदलांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.
हे पर्यायी मार्ग उपलब्ध असतील :दुपारी 2.45 ते 4.15 वाजेपर्यंत सी.एस.टी. जंक्शन वरून पूर्व मुक्त मार्गाने ने चेंबुरकडे जाणारी वाहने, डी. एन. रोड ने सर जे. जे. ब्रिजवरून दादर-माटुंगा वरून चेंबुर करिता पुर्व दृतगती महामार्गाचा वापर करता येईल. चर्चगेट रेल्वे स्थानकावरून पूर्व मुक्त मार्गाने चेंबुरकडे जाणारी वाहने वीर नरीमन रोडने सीटीओ जंक्शन-हजारी महल सोमानी मार्ग सी.एस.टी. जंक्शन सर जे जे उडड़ण पूल- दादर- माटुंगा वरून चेंबुर करिता पूर्व दृतगती महामार्गाचा वापर करतील. कफ परेड नेव्ही नगर वरुन पूर्व मुक्त मार्गाने ने चेंबुरकडे जाणारी वाहने नाथालाल पारेख मार्ग बघवार पार्क जंक्शन भोसले मार्ग मंत्रालय- गोदरेज जंक्शन- डॉ. आंबेडकर जंक्शन सी. टी. ओ. जंक्शन- हजारी महल सोमानी मार्ग- सीएसएमटी जंक्शन सर जे.जे. ब्रीज वरून दादर- माटुंगा वरून चेंबुर करिता पुर्व दृतगती महामार्गाचा वापर करतील. वाशीहून सीएसएमटी, कुलाबा चर्चगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी ईस्टर्न फ्री वेचा वापर न करता मानखुद-चेंबुर छेडा नगर-सुमन नगर जंक्शन- सायन-माटुंगा दादर भायखळा (पुर्व दृतगती महामार्ग ) सर जे. जे. उडड्ण पूल- सी. एस. एम. टी. जंक्शन वरून इच्छीत स्थळी मार्गस्थ होतील.