मुंबई :मुंबईकडे जाण्यासाठी महत्त्वाचा आणि हमखास समजला जाणारा रस्ता म्हणजे ठाण्याचा कोपरी पूल(Kopri Bridge in Thane) होय. या कोपरी पुलावर गर्डर टाकण्याचे काम काल रात्रीपासून सुरू झाले आहे. आज पहाटेपर्यंत हे काम चालणार होते. त्यामुळे सर्व वाहतूक ही दुसऱ्या रस्त्याने वळवली गेली आहे. मुंबईमध्ये पूर्व आणि पश्चिम या दोन्ही देशातून चारचाकी, दुचाकी आणि तीन चाकी वाहन येतात. त्यामध्ये ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आणि शहरी भागातून हजारो वाहन कोपरी पुलावरून पूर्व द्रुतगती मार्गाकडे म्हणजे मुलुंडकडे विक्रोळीकडे येण्यासाठी हा मार्ग (Traffic closed on Kopri Bridge) वापरतात. मात्र या पुलावर गर्डर टाकण्याचे काम नुकतेच ठाणे महापालिकेच्याकडून सुरू करण्यात आलेले असल्यामुळे या ठिकाणची वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद केली आहे.
वाहतूक व्यवस्था पूर्ववत :हा गार्डन टाकला गेल्यानंतर या पुलाची मजबूती वाढणार आहे. आणि प्रचंड वाहतूक आणि वर्ग असणाऱ्या या पुलाची क्षमता देखील वाढणार आहे. त्यामुळे हजारो वाहन या पुलावरून जात होती, ती तात्पुरत्या स्वरूपात ठाणे महापालिकेने बंद केलेली आहे. काम झाल्यानंतर ही वाहतूक व्यवस्था पूर्ववत केली जाणार (Traffic on Kopri Bridge) आहे.
वाहतूक बदल :पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी पूलाच्या निर्माणाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. यातील पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून मुख्य पूलाच्या म्हणजेच दुसऱ्या टप्प्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. या कामाचा एक भाग म्हणून या मार्गावर बसविलेल्या तुळई जोडल्या जाणार आहेत. त्यामुळे बुधवार ते शुक्रवारपर्यंत (28 December to 30 December) दररोज मध्यरात्री आणि पहाटेच्या वेळेत वाहतूक बदल लागू करण्यात आले (Traffic on Kopri Bridge in Thane) आहेत.
कोपरीब्रीज ८० टक्के काम पूर्ण -ठाणे, भिवंडी, नाशिककडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी मुख्य असलेला कोपरी ब्रीजवर (Bridge in Thane) पिकअप हावरमध्ये वाहतूक कोंडीच्या मोठ्या समस्या निर्माण झाल्या होत्या. सदर वाहतूक कोंडीचा प्रश्न गेल्या एक दशकापेक्षा जास्त काळ प्रलंबित राहिलेला होता. कोपरीब्रीज विस्ताराचा प्रस्ताव अंदाजे १४ वर्षांपूर्वी ठेवण्यात आलेला होता. ४८ कोटी रुपयांचा प्रस्ताव २५८ कोटींवर पोहचला. कोपरी पुलाचे चौपदरीकरणाचा प्रस्ताव हा अमंलात आणण्यात आला. २० नोव्हेंबरला कोपरब्रीजचे चौपदरीकरण करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले. केवळ डांबरीकरण आणि अन्य कामे शिल्लक आहेत. नव्या वर्षात कोपरी चौपदरीकरण झालेला पूल वाहतुकीसाठी खुला होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत (Traffic closed on Kopri Bridge in Thane) आहे.