मुंबई - अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त मुंबई शहरातील नागरिकांना अनेक गोष्टींची गरज आहे. असे असताना इतर दुकानांना बंदी घालणे चुकीचे असल्याचे व्यापारी संघटनेने म्हटले आहे. मुंबई रेड झोनमध्ये असली तरी केंद्राच्या निर्देशानुसार अन्य सेवांची दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहे. मुंबई महानगरपालिका केंद्राच्या निर्देशाचे पालन करत नसल्याचे 'फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशन' या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विरेन शहा यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी घेतलेला निर्णय चुकीचा आहे. यात बदल करण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचे शहा यांनी सांगितले.
मुंबईत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकानांच्या बंदीला व्यापारी संघटनेचा विरोध - विरेन शहा
लॉकडाऊनच्या काळात केश कर्तनालये बंद आहेत, या सारख्याच अनेक गोष्टींची गरज नागरिकांना आहे. असे असताना इतर दुकानांना बंदी घालणे चुकीचे असल्याचे व्यापारी संघटनेने म्हटले आहे. मुंबई रेड झोनमध्ये असली तरी केंद्राच्या निर्देशानुसार अन्य सेवांची दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहे. मुंबई महानगरपालिका केंद्राच्या निर्देशाचे पालन करत नसल्याचे 'फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशन' या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विरेन शहा यांनी सांगितले.
लॉकडाऊनच्या काळात केश कर्तनालये बंद आहेत, या सारख्याच अनेक गोष्टींची गरज नागरिकांना आहे. तसेच लहान मुलांना घरात बसवण्यासाठी खेळण्यांची गरज आहे. अनेक ग्राहकांनी या विषयी व्यापाऱ्यांकडे विचारणा केली आहे. अशी दुकाने सुरू केली नाहीत, तर अर्थव्यवस्था कशी मार्गी लागणार, दुकानातील कामगारांना रोजगार कसा देणार? असे प्रश्न शहा यांनी उपस्थित केले आहेत.
दरम्यान, मुंबई शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. मुंबईत रोज शेकडो कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत असल्याने सरकारच्या अत्यावश्यक सेवा नसलेली दुकाने उघडण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतीही दुकाने उघडू नये, असे आदेश पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत. त्यातच मद्याची दुकाने उघडल्याने शहरात सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न निर्माण झाल्याने आयुक्त परदेशी यांनी तातडीने हे परिपत्रक काढले.