मुंबई- गेल्या सहा महिन्यांपासून पर्यटन उद्योग बंद आहे. लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका पर्यटन व्यवसायालाही बसला आहे. मुंबईत अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. ही स्थळे पाहण्यासाठी रोज हजारो पर्यटकांची गर्दी असते. मात्र, लॉकडाऊनमुळे पर्यटनस्थळे ओस पडली आहेत.
गेट वे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल बघण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी व्हायची. यातून फोटोग्राफर, हॉटेल व्यावसायिक, रस्त्यांवर आईस्क्रीम आणि भेळपुरी विकणारे आदी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे उदरनिर्वाह व्हायचा. मात्र, कोरोनामुळे या सर्वांचा व्यवसाय ठप्प झाला आहे.