महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Coronavirus : राज्यात आज २ हजार ३६१ नवे पॉझिटिव्ह, 779 रुग्ण कोरोनामुक्त, 76 जणांचा मृत्यू - corona update of maharashtra

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ७१ हजार ५७३ नमुन्यांपैकी 70 हजार 013 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ६७ हजार ५५२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांसााठी ७२ हजार ७०४ खाटा उपलब्ध आहेत.

total corona cases in maharashtra
राजेश टोपे

By

Published : Jun 1, 2020, 10:01 PM IST

मुंबई - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेला लॉकडाऊन आता हळूहळू शिथील होत आहे. अशात राज्यात आज ७७९ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत ३० हजार १०८ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. दरम्यान, आज कोरोनाच्या २ हजार ३६१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात ३७ हजार ५३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.


आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ७१ हजार ५७३ नमुन्यांपैकी 70 हजार 013 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ६७ हजार ५५२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांसााठी ७२ हजार ७०४ खाटा उपलब्ध आहेत. सध्या ३६ हजार १८९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात ७६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू :

ठाणे- ७० (मुंबई ५२, ठाणे ५, नवी मुंबई ९, कल्याण डोंबिवली ४), नाशिक- (मालेगाव) 6, पुणे- 9, सोलापूर २, लातूर-१, उस्मानाबाद 1, अकोला-१, यवतमाळ 1. यातील ४५ पुरुष तर ३१ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ७६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३७ रुग्ण आहेत तर ३६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहेत. या ७६ रुग्णांपैकी ५१ जणांमध्ये ( ६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २३६२ झाली आहे.


राज्यातील जिल्हानिहाय कोरोना रुग्णांचा तपशील -


*मुंबई महानगरपालिका: बाधीत रुग्ण- (४१,०९९), बरे झालेले रुग्ण- (१६,९८५), मृत्यू- (१३१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२,७८९)
*ठाणे: बाधीत रुग्ण- (९९४१), बरे झालेले रुग्ण- (३६३७), मृत्यू- (२१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६०८९)
*पालघर: बाधीत रुग्ण- (१०७१), बरे झालेले रुग्ण- (३९१), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६४७)
*रायगड: बाधीत रुग्ण- (११४८), बरे झालेले रुग्ण- (५९८), मृत्यू- (४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५०७)
*नाशिक: बाधीत रुग्ण- (११८२), बरे झालेले रुग्ण- (८९३), मृत्यू- (६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२२)
*अहमदनगर: बाधीत रुग्ण- (१२०), बरे झालेले रुग्ण- (५७), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५७)
*धुळे: बाधीत रुग्ण- (१४५), बरे झालेले रुग्ण- (८८), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१)
*जळगाव: बाधीत रुग्ण- (६९६), बरे झालेले रुग्ण- (२९८), मृत्यू- (७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२६)
*नंदूरबार: बाधीत रुग्ण- (३५), बरे झालेले रुग्ण- (२७), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५)
*पुणे: बाधीत रुग्ण- (८०४५), बरे झालेले रुग्ण- (३७९३), मृत्यू- (३३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९१४)
*सोलापूर: बाधीत रुग्ण- (९३३), बरे झालेले रुग्ण- (४२३), मृत्यू- (७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४०)
*सातारा: बाधीत रुग्ण- (५२७), बरे झालेले रुग्ण- (१७७), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३३४)
*कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (५०९), बरे झालेले रुग्ण- (१५०), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५५)
*सांगली: बाधीत रुग्ण- (११२), बरे झालेले रुग्ण- (६२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९)
*सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (३३), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५)
*रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (२६४), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६०)
*औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (१५४३), बरे झालेले रुग्ण- (१०१२), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४६३)
*जालना: बाधीत रुग्ण- (१२९), बरे झालेले रुग्ण- (५७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७१)
*हिंगोली: बाधीत रुग्ण- (१९०), बरे झालेले रुग्ण- (१०६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८४)
*परभणी: बाधीत रुग्ण- (६३), बरे झालेले रुग्ण- (३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५९)
*लातूर: बाधीत रुग्ण- (१२५), बरे झालेले रुग्ण- (६०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६२)
*उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (७६), बरे झालेले रुग्ण- (२६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९)
*बीड: बाधीत रुग्ण- (४७), बरे झालेले रुग्ण- (२६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (२०)
*नांदेड: बाधीत रुग्ण- (१२३), बरे झालेले रुग्ण- (९१), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६)
*अकोला: बाधीत रुग्ण- (६०३), बरे झालेले रुग्ण- (३२६), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४८)
*अमरावती: बाधीत रुग्ण- (२३२), बरे झालेले रुग्ण- (१२४), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९२)
*यवतमाळ: बाधीत रुग्ण- (१३०), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०)
*बुलढाणा:* बाधीत रुग्ण- (६३), बरे झालेले रुग्ण- (३३), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७)
*वाशिम: बाधीत रुग्ण- (८), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२)
*नागपूर: बाधीत रुग्ण- (५९२), बरे झालेले रुग्ण- (३७८), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०३)
*वर्धा: बाधीत रुग्ण- (९), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७)
*भंडारा: बाधीत रुग्ण- (३२), बरे झालेले रुग्ण- (९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३)
*गोंदिया: बाधीत रुग्ण- (६६), बरे झालेले रुग्ण- (३८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८)
*चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (२६), बरे झालेले रुग्ण- (१७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९)
*गडचिरोली: बाधीत रुग्ण- (३६), बरे झालेले रुग्ण- (१०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६)
*इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (६०), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५)
*एकूण: बाधीत रुग्ण-(७०,०१३), बरे झालेले रुग्ण- (३०,१०८), मृत्यू- (२३६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९),ॲक्टीव्ह रुग्ण-(३७,५३४)*


राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्याठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ३२९४ कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत. आज एकूण १८ हजार ६७४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ७०.६९ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details