महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 30, 2021, 7:14 AM IST

Updated : Jun 30, 2021, 1:51 PM IST

ETV Bharat / state

Top 10 @ 11 AM : सकाळी अकरावाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या...

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना, पाऊस यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Top 10 @ 11 AM
Top 10 @ 11 AM

Delta plus variant : डेल्टा प्लसची लागण झालेले 21 पैकी 20 रुग्ण बरे, चिंतेची गरज नाही - राजेश टोपे

मुंबई : कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हॅरिएन्टचे रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात संभाव्य तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी 70 टक्के लसीकरण होणे गरजेचे असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात डेल्टा प्लस व्हॅरिएन्टची लागण झालेल्या 21 पैकी 20 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याचे सांगताना चिंता करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

  • Sero survey : मुंबईत १५ जुलैपासून महापालिकेकडून पाचवा सेरो सर्व्हे

मुंबई : राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात असताना दुसऱ्या लाटेत किती नागरिकांमध्ये अँटिबॉडी विकसित झाल्या हे जाणून घेण्यासाठी मुंबई महापालिका आता पाचवा सेरो सर्व्हे करणार आहे. येत्या पंधरा जुलैपासून सरसकट सेरो सर्व्हे केला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत चार सेरो सर्व्हे करण्यात आलेले आहेत.

  • अपेक्सकेअर हॉस्पिटल प्रकरण : कमिशन घेणाऱ्या तीन रुग्णवाहिका चालकांना अटक

सांगली - मिरजेतील अपेक्सकेअर हॉस्पिटलमधील 87 रुग्ण मृत्यू प्रकरणी तीन रुग्णवाहिका चालकांना अटक करण्यात आली आहे. रूग्ण दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका चालकांनी 7 हजार रुपये कमिशन घेतल्याचे पोलीस तपासात समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. तर अपेक्स प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या 13 झाली आहे. आत्ता पर्यंत 16 नातेवाईकांनी डॉ. महेश जाधव विरोधात तक्रार दिली आहे.

  • प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सुरु असलेली कारवाई राज्य सरकारच्या बदनामीसाठी सुरु असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपावर केला. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. बैठकीत विधानसभा अधिवेशन, महामंडळ आणि अनिल देशमुख यांच्याबाबत चर्चा करण्यात आल्याचे मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व मंत्र्यांची बैठकीला उपस्थिती होती.

  • तर फडणवीसांच्या कटकटी आणि त्रासामुळे राज्यातील जनतेची सुटका होईल - भास्कर जाधव

रत्नागिरी - विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खरंच राजकीय संन्यास घ्यावा, तुम्ही जर राजकीय संन्यास घेतला तर तुमच्या कटकटी आणि त्रासामुळे राज्यातील जनतेची सुटका होईल, अशी टीका शिवसेना प्रवक्ते आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे. कायम राजकीय संन्यास घ्या, असं मी म्हणत नाही. राज्यातील कोरोना नामशेष होईपर्यंत राजकीय सन्यास घ्या, असाही टोला भास्कर जाधव यांनी लगावला आहे.

  • अहमदनगर शिवसेनेत राडा! संपर्कप्रमुखांसह नगरसेवकांना मारहाण, नगरसेविकेच्या दिराची तक्रार

अहमदनगर- शहरात सध्या महापालिके महापौर उपमहापौर पदाच्या निवडीने राजकारण तापले आहे. अहमदनगरच्या महापालिकेवर बुधवारी भगवा फडकणार आहे. तत्पूर्वीच शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास चांगलाच राडा झाला. महापौर पदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांची बिनविरोध निवड झाली असून आज(बुधवारी) त्याची औपचारिक घोषणा होणार आहे. मात्र, तत्पूर्वीच शिवसेनेच्या दोन गटात जोरदार राडा झाला.

  • मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आपत्कालीन पॅरोलसाठी अपात्र; न्यायालयाने याचिका फेटाळली

नागपूर- कोरोना संक्रमणाचे कारण देत मुंबई येथे १९९८ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील दोन कैद्यांनी आपत्कालीन पॅरोलसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र या कैद्यांनी केलेले गुन्हे आणि त्यांचा पूर्वीचा रेकॉर्ड बघता न्यायालयाने त्यांची याचिका गुणवत्ताहीन ठरवत पॅरोल नाकारला आहे.

  • Maha Vikas Aghadi : शरद पवार-उद्धव ठाकरेंदरम्यान तासभर खलबतं; अनिल देशमुखांसह अनेक मुद्यांवर चर्चा!

मुंबई : अनेक मुद्द्यांवरून राज्यातील राजकारण तापलेलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेंत्यामध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. यात अनिल देशमुख यांच्यावरील ईडीच्या कारवाईसह राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि इतर महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे. दरम्यान, या भेटीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.

  • अँटिबॉडी तयार झाल्या नाहीत, अदर पूनावाला यांच्यासह 7 जणांविरोधात कोर्टात अर्ज

लखनऊ -कोविशिल्डचा डोस घेतल्यानंतरही शरिरात प्रतिपिंड म्हणजे अँटीबॉडीज तयार न झाल्याने एका व्यक्तीने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेविरोधात (आयसीएमआर) कोर्टात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर कोर्टाने संबंधित पोलीस ठाण्याकडून अहवाल घेतला असून पुढील सुनावणी 2 जुलै रोजी करण्याचे आदेश दिले आहेत. लस घेतल्यानंतर शरिरात अँटीबॉडीज(प्रतिपिंड) तयार झाल्या नाहीच, तर सामान्य प्लेटलेट्सदेखील कमी झाल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

  • माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे ईडीला पत्र, जबाब नोंदवण्यासाठी दिला 'व्हीसी'चा पर्याय

मुंबई- ईडीने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना समन्स बजावले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आज देखमुखांची चौकशी केली जाणार होती. मात्र, देशमुखांनी पुन्हा एकदा ईडीला पत्र पाठवले आहे. पत्रात लिहिलंय की, ईडीला चौकशी करायची असेल तर ती ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून करावी.

Last Updated : Jun 30, 2021, 1:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details