महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 26, 2021, 7:53 AM IST

Updated : Jul 26, 2021, 1:23 PM IST

ETV Bharat / state

Top 10 @ 1 PM : सकाळी 1 वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या

वाचा दुपारी 1 वाजेपर्यंतच्या देशभरातील ठळक 10 बातम्या

ठळक 10 बातम्या
ठळक 10 बातम्या

  • मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक केली आहे. या अटकेला आव्हान देणारी याचिका राज कुंद्राने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. दरम्यान, अशी माहिती समोर येत आहे, की मुंबई पोलीस पुन्हा एकदा राजच्या कंपनीत भागीदार असलेल्या पत्नी शिल्पाची पुन्हा चौकशी करू शकतात. आज पुन्हा शिल्पाला बोलावण्याची शक्यता आहे. यापूर्वी 23 जुलै रोजी शिल्पाची चौकशी करण्यात आली होती. यावेळी तिच्यासमोर पती राज कुंद्राही होता. वाचा सविस्तर...
  • LIVE Updates @BSYBJP : अखेर येदियुरप्पांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; राज्यपालांकडे केला सुपूर्द. वाचा सविस्तर...
  • नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी सोमवारी ट्रॅक्टर चालवत संसदेत पोहोचले. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध दर्शविण्यासाठी राहुल ट्रॅक्टर चालवत संसदेत दाखल झाले. यावेळी ट्रॅक्टरला कृषी कायद्यांना विरोध दर्शविणारे फलक लावले होते. वाचा सविस्तर...
  • कराड (सातारा) - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पाटण तालुका दौर्‍यावर येण्यासाठी मुंबईहून सातार्‍यात आले. परंतु, खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांना पुण्याला परत जावे लागले आहे. पाटण तालुक्यातील आंबेघर आणि मिरगाव येथे झालेल्या भूस्खलानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज पाटण तालुका दौर्‍यावर येणार होते. कोयनानगर येथील हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर लँड होणार होते. परंतु, खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांना पुण्याला जावे लागले आहे. वाचा सविस्तर...
  • LIVE Tokyo Olympics : टेनिसपटू सुमित नागलचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपूष्टात. वाचा सविस्तर...
  • नवी दिल्ली - येथील महाराष्ट्र सदनातील राज्यपालांच्या कक्षात आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, अजून आगीचे कारण समोर आलेले नाही. वाचा सविस्तर...
  • कोल्हापूर - निकृष्ट दर्जाच्या कामामुळे बहुचर्चित असलेल्या वासणोली धरणाच्या सांडव्याला भगदाड पडले आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होऊन परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सांडव्यातील या पाण्यामुळे जवळपास 45 फूट खोल आणि शंभर फूट लांबीपर्यंत माती खंगाळून गेली आहे. वाचा सविस्तर...
  • LIVE Tokyo Olympics : तिरंदाजी - भारतीय पुरुष संघाचा कोरियाकडून दारूण पराभव. वाचा सविस्तर...
  • औरंगाबाद - लग्नात हुंडा मागणे आणि तो देणे असे प्रकार आजही सर्रास सुरू आहेत. त्यात सोने, वाहन, घर मागण्याचे प्रकार अनेक वेळा समोर आले आहेत. मात्र, लग्नाच्या आधीच 10 लाख रुपायांसह हुंड्यात 21 नखी कासव आणि लॅब्राडोर कुत्रा मागितल्याचा प्रकार रमानगर भागात समोर आला आहे. या प्रकरणी उस्मानापुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुलगा आकाश सैन्यात कार्यरत आहे. तर त्याची बहिण क्राईम शोमध्ये कलाकार म्हणून काम करत असल्याचं समोर आलं आहे. वाचा सविस्तर...
  • जळगाव -शिवसेनेचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर 4 ते 5 जणांनी गोळीबार केल्याची घटना रविवारी (25 जुलै) रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. हल्लेखोरांनी कुलभूषण पाटील यांचा कारने पाठलाग केला. यावेळी 1, तर त्यांच्या पिंप्राळा परिसरातील घराजवळ 3 असे 4 राऊंड फायर केले. सुदैवाने या हल्ल्यात पाटील बचावले आहेत. क्रिकेट खेळताना दोन गटात झालेल्या भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून उपमहापौर पाटील यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी रात्री उशिरा रामानंदनगर पोलीस ठाण्यात 4 ते 5 संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर...

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Last Updated : Jul 26, 2021, 1:23 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details