मुंबई- आज गुरुपोर्णिमा, त्या निमित्तान राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या गुरूंबद्दलच्या भावना.. देशात गेल्या २४ तासात २२ हजार ७७१ नवे कोरोनाबाधित रुग्ण... महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासातील कोरोनाबाधित रुग्णांचा उच्चांक, आढळले ७ हजार ७४ नवे रुग्ण.. यासह राज्य देशभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर
सातारा - 5 जुलै हा दिवस सर्वत्र गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. गुरुविषयी आपली भावना व्यक्त करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचे काम केले जाते. या अनुषंगाने 'ईटीव्ही भारत'ने 'तस्मै श्री गुरुवे नम:' या मालिकेच्या माध्यमातून राज्यातील विविध सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी या सर्वांनी आपापल्या गुरुविषयी आपली भावना व्यक्त करत त्यांचे आभार मानले. तसेच त्यांच्या शिकवणी आणि आठवणींना उजाळा दिला.
वाचा सविस्तर - गुरुपौर्णिमा विशेष : 'कसोटीच्या प्रसंगात परिस्थितीवर मात करण्याचे भान देणारे गुरू' - तेजस्वी सातपुते
हैदराबाद -आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील 24 तासात 22 हजार 771 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 442 जणांचा मृत्यू झाला. या नव्या रुग्णांसह देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाख 48 हजार 315 इतका झाला आहे. यात 2 लाख 35 हजार 433 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 3 लाख 94 हजार 226 जणांनी कोरोनाला मात दिली आहे. 18 हजार 665 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
वाचा सविस्तर - देशभरातील कोरोनासंबंधी महत्वाच्या घडामोडी; वाचा एका क्लिकवर...
सोलापूर- शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरात कडक लॉकडाऊन, करावा अशी मागणी केली जात आहे. सोलापूरात लॉकडाऊन करण्यापूर्वी सर्व घटकांशी चर्चा करूनच लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
वाचा सविस्तर -पाच दिवस अगोदर पूर्व सूचना देऊन सोलापुरात संचारबंदी लावणार - पालकमंत्री भरणे
मुंबई- देशांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या असलेल्या महाराष्ट्रात गेले काही दिवस दैनिक 5 हजार कोरोना रुग्णांची काल ६ हजार नोंद झाल़्यानंतर आज पहिल्यांदाच रुग्णांची संख्या सात हजार पार झाली आहे. शनिवारी कोरोनाच्या ७ हजार ७४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात ८३ हजार २९५ रुग्णांवर (अॅक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज ३ हजार ३९५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या १ लाख ८ हजार ८२ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.२ टक्के एवढे आहे
वाचा सविस्तर -शनिवारी 7 हजार 74 कोरोनाबाधित; आतापर्यंतचे सर्वाधिक 295 मृत्यू
मुंबई - कोरोना विषाणूचे मुंबईत शनिवारी नवे 1 हजार 180 रुग्ण आढळून आले. तर 68 जणांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांसह मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 82 हजार 814 वर पोहचला आहे. तर मृतांचा आकडा 4 हजार 827 इतका झाला आहे. मुंबईमधून शनिवारी 1 हजार 71 जण कोरोनामुक्त झाले. यासह कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा 53 हजार 463 झाला आहे. मुंबईत सध्या 24 हजार 524 सक्रिय रुग्ण असून मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचा दर 64 टक्क्यांवर पोहोचला आहे. ही माहिती पालिकेच्या आरोग्यविभागाने दिली.
वाचा सविस्तर - मुंबई : 1071 जण कोरोनामुक्त तर नव्या 1180 रुग्णांची भर, कोरोनाग्रस्तांचा आकडा 82814 वर...