मुंबई- भारत चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी लेहमध्ये दाखल.. जगभरात पसरलेल्या कोरोना महामारीचा सामना करणारी लस भारतात विकसित झाली आहे.. १५ ऑगस्टला उपलब्ध होण्याची शक्यता... या सारख्या महत्वाच्या १० बातम्यांचा आढावा वाचा ईटीव्ही भारतवर...
नवी दिल्ली -देशात कोरोनाच्या वाढत्या प्रभावात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत कोरोनावरची लस 'कोवैक्सीन' लॉन्च होऊ शकते. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव यांनी भारत बायोटेक आणि वैद्यकीय महाविद्यालयांचे मुख्य तपासनीस यांना लिहलेल्या पत्रात म्हटले की, स्वदेशी कोरोना लस कोवैक्सीनची चाचणी प्रक्रिया वेगाने पूर्ण करा ज्यामुळे या वैद्यकीय चाचणीचा निकाल 15 ऑगस्टपर्यंत येऊ शकेल.
वाचा सविस्तर -15 ऑगस्टपर्यंत लाँच होऊ शकते देशातील पहिली कोरोनावरची लस
नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चिफ ऑफ डिफेन्स स्टाफचे प्रमुख बिपीन रावत हे लेह येथे दाखल झाले आहेत. आज (शुक्रवारी) माध्यमांना कल्पना न देता पंतप्रधान लडाखला गेले असल्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीडीएस प्रमुख रावत भारत-चीन लडाख येथील सद्यपरिस्थितीवर पंतप्रधानांना माहिती देणार आहेत.
वाचा सविस्तर -पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सीडीएस प्रमुख बिपीन रावत लेहमध्ये दाखल
श्रीनगर(जम्मू काश्मीर)-केंद्रीय राखीव पोलीस दलाचा जवान आणि एका पाच वर्षाच्या मुलावर गोळी चालवलेल्या दहशतवाद्याचा एन्काऊंटर सुरक्षा दलांकडून करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी घडली आहे.
वाचा सविस्तर-बीजबेहरा येथे सुरक्षा दलांकडून एका दहशतवाद्याचा एन्काऊंटर
चंद्रपूर - मागील पाच महिन्यांत जिल्ह्यात 31 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अशा शेतकऱ्यांची प्रकरणे निकाली काढून पात्र आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला 1 लाख शासकीय मदत दिली जाते. मात्र, मागील पाच महिन्यात यासंबंधी एकही बैठक झाली नाही. त्यामुळे एकाही पात्र कुटुंबाला याचा लाभ मिळाला नाही. यासंदर्भातील बातमी 'ईटीव्ही भारत'ने प्रकाशित केली होती. ही बातमी प्रकाशित होताच जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार तत्काळ बैठक घेण्यात आली. यात 17 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची प्रकरणे पात्र ठरली आहेत. लवकरच त्यांना शासनाची मदत राशी दिली जाणार आहे.
वाचा सविस्तर -ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : 5 महिन्यांनंतर 'त्या' शेतकऱ्यांची प्रकरणे निकाली, 17 आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना मिळणार लाभ
पुणे - नात्यावरचा विश्वास उडून जाणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने स्वतःच्या अल्पवयीन चुलत पुतणीला पैसे मिळवून देण्याच्या अमिष दिले. याानंतर तिला बुलडाणा येथून पुण्यात आणले आणि देहविक्री करण्यास भाग पाडले. याप्रकरणी आरोपी काका-काकूंना अटक करण्यात आली आहे. हडपसर पोलिसांनी ही कारवाई केली. तर पीडित मुलीची सुटका करत तिची रवानगी आई-वडिलांकडे केली.