- मुंबई - राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. यासंदर्भात आता राज्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणूक आयोगाकडे भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी तक्रार दाखल केली असून धनंजय मुंडे यांनी त्यांच्या लग्नाबद्दल व मुलांबद्दल माहिती लपवल्याचा आरोप केला आहे. धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. मात्र, कायदा काय म्हणतोय या बाबत अॅड. असीम सरोदे यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.
वाचा सविस्तर -धनंजय मुंडे यांची आमदारकी जाणार का? काय म्हणतोय कायदा
- मुंबई :धनंजय मुंडे प्रकरणी आता संजय राऊतांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. काही गोष्टी खासगी, कौटुंबिक असतात त्या तशाच पद्धतीने सोडवल्या गेल्या पाहिजेत. कौटुंबिक गोष्टींमध्ये राजकीय भूमिका नको असे मत राऊत यांनी व्यक्त केले.
वाचा सविस्तर -कौटुंबिक गोष्टींमध्ये राजकीय भूमिका नको; मुंडे प्रकरणी संजय राऊतांची प्रतिक्रिया
- वर्धा -'सामान्य टोळ वट्वट्या' हा हिवाळ्यात एक ठिकाणाहून दुसऱ्या भागात स्थलांतर करणारा पक्षी आहे. पक्षी निरीक्षणा दरम्यान हा पक्षी जिल्ह्यात प्रथमच आढळला आहे. बहार नेचर फाउंडेशनचे पक्षीअभ्यासक दिलीप वीरखडे यांनी हा पक्षी पवनार येथील धामनदी परिसरात दिसल्याचे नोंदवले आहे. पवनारच्या धाम किनाऱ्यावरील झुडपात हा पक्षी अभ्यासक दिलीप वीरखडे यांना आढळला.
वाचा सविस्तर -वर्धा जिल्ह्यात प्रथमच टोळ वटवट्याची नोंद
- बीजिंग - जगभरात कोरोनाचा प्रसार होवून आता एक वर्ष होत आले आहे. मात्र, अद्यापही कोरोना विषाणूचा फैलाव नक्की कोठून झाला? कोणत्या प्राण्यापासून झाला? याचा वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे शोध लागला नाही. चीनमधील वुहान शहरातील मांस बाजारातून कोरोना जगभरात पसरला असेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. मात्र, त्यास योग्य असे पुरावे अद्यापही मिळाले नाहीत. याच सर्व गोष्टींचा शोध घेण्यासाठी आता जागतिक आरोग्य संघटनेचे पथक वुहान शहरात दाखल झाले आहे.
वाचा सविस्तर -कोरोना प्रसाराचं मूळ शोधण्यासाठी WHO ची टीम चीनमध्ये दाखल
- नागपूर - संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या नावाने महाराष्ट्रात निर्माणाधीन असलेल्या दोन पालखी महामार्गांचा सर्वंकष विकास आणि सुशोभीकरण यासाठी सूचना पाठवण्याचे आवाहन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. ‘या दोन महामार्गांचे सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्व लक्षात घेता त्यांचे सुसंगतरीत्या सुशोभीकरण करण्याचा मानस असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वाचा सविस्तर -पालखी महामार्गांच्या सुशोभीकरणासाठी सूचना पाठवा; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आवाहन
- मुंबई -केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून शिवसेनेचे मुखपत्र सामनातून पंतप्रधान मोदींवर टीका करण्यात आली आहे. सरकारने न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आंदोलक शेतकऱ्यांवर बार उडवला आहे. न्यायालयाने जरी कायद्यांना स्थगिती दिली असली तर आंदोलन गुंडाळले गेल्यावर सरकार स्थगिती उठवून कायदे पुन्हा लागू करेल, ही भीती शेतकऱ्यांत असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.