महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Top १० @ 9 PM : रात्री नऊपर्यंतच्या ठळक बातम्या... - ठळक घडामोडी

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

top-10-news-at-9-pm
Top १० @ 9 PM : रात्री नऊपर्यंतच्या ठळक बातम्या...

By

Published : Aug 3, 2020, 8:58 AM IST

Updated : Aug 3, 2020, 9:39 PM IST

  • नवी दिल्ली- कोरोनावरील लसीबाबत संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असताना सकारात्मक बातमी आहे. भारतीय औषध नियंत्रक महासंचालनयाने (डीजीएसी) पुण्याच्या सिरमला कोरोनावरील लसीची (कोविशिल्ड) दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणी घेण्याची परवानगी दिली आहे. अधिकाऱ्याच्या माहितीनुसार सिरमकडून लवकरच 4 हजार ते 5 हजार स्वयंसेवकांवर कोविशिल्डची चाचणी घेण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा -सिरमच्या लसीला दुसऱ्यासह तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सरकारकडून परवानगी

  • मुंबई - सिनेकलावंत सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूची चौकशी करण्यास आलेल्या बिहार पोलीस दलातील अधिकारी विनय तिवारी यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तिवारी यांच्या तपासात अनेकांची नावे समोर येऊ शकतील म्हणून, त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या केसचा तपास योग्य दिशेने होण्यासाठी पालिकेने तिवारी यांचे क्वारंटाईन रद्द करावे, या मागणीसाठी आज भाजपने गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन केले.

सविस्तर वाचा -विनय तिवारी यांचे क्वारंटाईन रद्द करा, भाजपचे आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन

  • रांची- रक्षाबंधनादिवशी बहिण-भावाच्या प्रेमातील अतूट नाते दाखविणारी घटना समोर आली आहे. दंतेवाडात आठ लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षलवादी हा बहिणीला भेटण्यासाठी रक्षाबंधनादिवशी गावी परतला. बहिणीने विनंती केल्यानंतर हा मल्ला नावाचा नक्षलवादी पोलिसांना शरण आला आहे.

सविस्तर वाचा -बहिणीच्या भावूक आवाहनानंतर रक्षाबंधनदिवशीच नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

  • सांगली - कोरोनाला न घाबरता राम मंदिर भूमिपूजन सोहळा तमाम हिंदू समाजाने दिवाळी-दसऱ्याप्रमाणे साजरा करावा असे आवाहन शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले आहे. तसेच मंदिरात स्थापन करण्यात येणाऱ्या राम लक्ष्मणच्या मूर्त्यांना मिश्या असाव्यात अशी विनंती भिडे यांनी केली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी निमंत्रण नसेल तरी आयोध्याला जावे, असा सल्ला संभाजी भिडे यांनी दिला आहे. ते आज सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

सविस्तर वाचा -अयोध्येतील राम-लक्ष्मणाच्या मूर्तीला असाव्यात मिश्या, संभाजी भिडेंची मागणी

  • नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कोरोनावरील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. यावरून काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. गृहमंत्री हे एम्स या सरकारी रुग्णालयात का दाखल झाले नाहीत, असा प्रश्न थरुर यांनी उपस्थित केला आहे.

सविस्तर वाचा -अमित शाह रुग्णालयात दाखल झाल्यानंतर शशी थरुर यांच्याकडून 'हा' प्रश्न उपस्थित

  • मुंबई - आतापर्यंत ५६ लोकांचे जवाब नोंदवले आहेत. सुशांतसिंह राजपूत याच्या मोबाईल व लॅपटॉपमधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. १५ जूनला फॉरेन्सिक टीम सुशांतसिंहच्या घरातून काही पुरावे घेऊन गेली होती. सुशांतचे आर्थिक व्यवहार तपासले आहेत. याप्रकरणी तपासात कोणालाही सूट देण्यात आली नसून तपास सुरू आहे, अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.

सविस्तर वाचा -मुंबई पोलिसांना सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणी तपास करण्याचा अधिकार - पोलीस आयुक्त

  • नाशिक - सत्ताधारी ठाकरे सरकारच्या हलगर्जीपणामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. ठाकरे व अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाची फसवणूक केली असून आरक्षणाबाबत त्यांच्या मनात पाप असल्याचा गंभीर आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष तथा मराठा आरक्षण समितीचे सदस्य विनायक मेटे यांनी केले.

सविस्तर वाचा -मराठा आरक्षणाबाबत ठाकरे, चव्हाणांच्या मनात पाप; विनायक मेटेंचा आरोप

  • मुंबई - अभिनेता सुशांत सिंग यांच्या मृत्यूबाबत चौकशी करण्यास आलेले आयपीएएस अधिकारी विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने क्वारंटाईन केले आहे. या प्रकारावरून राजकारण तापले असताना पालिकेने विनय तिवारी यांना केलेल्या क्वारंटाईनबाबत खुलासा केला आहे. तिवारी यांनी विमान प्रवास केला असल्याने त्यांना नियमानुसार क्वारंटाईन करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा-बिहार पोलीस अधिकारी विनय तिवारी यांना नियमानुसारच क्वारंटाईन केले ; मुंबई महापालिकेचे स्पष्टीकरण

  • मुंबई- कोरोना संसर्ग काळात सर्वाधिक फटका बसलेल्या स्थलांतरित मजूर लॉकडाऊनच्या काळात 50 लाख संख्येने त्यांच्या गावी गेले होते. पण आता मिशन बिगिन अंतर्गत व्यवसाय सुरू झाल्यामुळे परराज्यातील मजूर परत येण्यास सुरवात झाली आहे. आतापर्यंत 13 ते 14 लाख स्थलांतरित मजूर राज्यात परत आले आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

सविस्तर वाचा-मिशन बिगेन अगेनमध्ये 14 लाख स्थलांतरित मजूर परतले - कामगारांची नोंदणी बंधनकारक केल्याने माहिती

  • देहरादून– नेपाळने सीमारेषेचे वाद भडकिणारे पुन्हा कृत्य केले आहे. उत्तराखंडमधील धरचौलाच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी (एसडीएम) यांनी नेपाळच्या काही संस्था उत्तराखंडमध्ये अतिक्रमण करत असल्याचे नेपाळच्या प्रशासनाला पत्र लिहिले होते. त्यावर नेपाळच्या यंत्रणेने नेपाळचे नागरिक हे उत्तराखंडमधील वादग्रस्त भागात प्रवास करण्यासाठी मुक्त असल्याचे उद्दामपणे पत्रातून उत्तर दिले आहे.

सविस्तर वाचा-उत्तराखंडमधील भूभागाबाबत नेपाळची पुन्हा वादग्रस्त भूमिका; 'हा' केला दावा

Last Updated : Aug 3, 2020, 9:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details