महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिल्लीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक, येत्या दोन दिवसात पेच सुटण्याची शक्यता

दिल्लीतील बैठकीनंतर पुढील दोनच दिवसात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाकडून सर्वसमावेशक कार्यक्रमाच्या आधारे सत्तास्थापनेचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आघाडीतील एका वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आली.

काँग्रेस, राष्ट्रवादी

By

Published : Nov 19, 2019, 9:43 PM IST

Updated : Nov 20, 2019, 3:17 AM IST

मुंबई- काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची आज (बुधवार) दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 6 जनपथ या निवासस्थानी बैठक होणार आहे. ही बैठक सायंकाळी पाच वाजता होणार असून या बैठकीनंतर राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र, या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

हेही वाचा -सर्व काही जुळवून घेण्यासाठी वेळ लागतोय - बाळासाहेब थोरात

दिल्लीतील बैठकीनंतर पुढील दोनच दिवसात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाकडून सर्वसमावेशक कार्यक्रमाच्या आधारे सत्तास्थापनेचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आघाडीतील एका वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आली.

सत्तास्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून आज दिल्ली येथे काही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत अनौपचारिक चर्चा झाली असून त्यातही सकारात्मक पाऊल सेनेकडून उचलले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा -...तर भाजपला मोठी किंमत मोजावी लागेल, संजय राऊतांचा इशारा

आज दिल्लीत होणाऱ्या बैठकीला काँग्रेसचे राज्य प्रभारी मल्लीकर्जून खरगे, वरिष्ठ नेते अहमद पटेल यांच्यासह प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रवक्ते नवाब मलिक आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आदी नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत प्रामुख्याने दोन्ही पक्षाने नेते हे किमान समान कार्यक्रमावर चर्चा करतील. त्यामुळे या बैठकीनंतर किमान समान कार्यक्रम उद्या अंतिम होईल, आणि त्यानंतर दोन ते तीन दिवसांत सत्तास्थापनेसाठीचा अंतिम निर्णय होईल, असेही सांगण्यात आले.

Last Updated : Nov 20, 2019, 3:17 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details