मुंबई -रश्मी शुक्ला यांच्याविरोधात राज्यसरकार कायदेशीर कारवाई करणार आहे. फोन टॅपिंग प्रकरणात ही कारवाई केली जाणार आहे. तर परमबीर सिंग यांच्या विरोधातही शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी होणार आहे.सविस्तर वाचा..
मुंबई - अँटिलिया स्फोटके आणि मनसुख प्रकरणात वाझेंना अटक होताच परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आली. या प्रकरणात सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. तसेच परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने दिला. सविस्तर वाचा..
मुंबई -बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानला कोरोनाची लागण झाली आहे. आमिर खानच्या टीमने ही माहिती दिली आहे. सध्या आमिर खानने स्वत:ला होम क्वारंटाईन केलं आहे.सविस्तर वाचा..
नवी दिल्ली -महागाईची झळ सोसणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. वर्षभरानंतर पहिल्यांदाच पेट्रोल व डिझेलच्या किमती कमी झाल्या आहेत. पेट्रोलचे दर प्रति लिटर १८ पैशांनी तर डिझेलचे दर १७ पैशांनी कमी झाले आहेत. सविस्तर वाचा..
मुंबई - बदलीच्या प्रकरणावरून विरोधीपक्षाने राज्य सरकारवर टीका केली, यावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी त्यांना प्रत्त्युत्तर दिले आहे. मात्र राज्य सरकार हे खंबीर असून सरकारला अस्थिर करण्याचा कट सध्या विरोधक करत आहेत, असा टोला मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.सविस्तर वाचा..
मुंबई - केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून दिव्यांगांसाठी विविध उपाययोजना केल्या जातात. त्यांना दिव्यांग म्हणून लाभ दिला जातो. व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदतही केली जाते. त्यासाठी दिव्यांगांची नोंद होणे गरजेचे असते. मात्र मुंबईमधील दिव्यांग मुलांची नोंदणीच होत नसल्याचा प्रकार राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी उघडकीस आणला आहे.सविस्तर वाचा..
चंदिगढ :हरियाणाच्या वल्लभगडमध्ये झालेल्या निकिता तोमर हत्या प्रकरणाचा निकाल आज (बुधवार) जाहीर होण्याची शक्यता आहे. २६ ऑक्टोबर २०२०ला दिवसाढवळ्या तौसिफ नावाच्या तरुणाने निकिताची गोळी मारुन हत्या केली होती. याप्रकरणी हरियाणामधील जिल्हा व सत्र न्यायालय आज निकाल जाहीर करेल. सविस्तर वाचा..
नवी दिल्ली -सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती एन.व्ही. रमण यांच्या नावाची केंद्राकडे शिफारस केली आहे. शरद बोबडे यांचा कार्यकाल लवकरच संपणार आहे. त्यामुळे नवीन सरन्यायाधीश नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे.सविस्तर वाचा..
मुंबई - इंडियन आयडॉल हा प्रेक्षकांची पसंती मिळविलेला म्युझिक रियालिटी शो आहे, ज्याचे यावर्षी १२ वे पर्व सुरु आहे. बॉलिवूडचे कलाकार असोत वा सामान्य माणूस, प्रत्येकजण या कार्यक्रमाचा प्रचंड चाहता आहे. इंडियन आयडॉलने देशभरातील संगीत रसिकांच्या हृदयात एक विशेष स्थान मिळविले आहे. या कार्यक्रमात विशेष सांगीतिक भाग प्रस्तुत केले जातात आणि त्यासंबंधित बॉलिवूडमधील प्रतिष्ठित व्यक्तींना पाहुणे म्हणून बोलावले जाते. या विकेंडला इंडियन आयडॉल १२ च्या मंचावर ‘ऋषी कपूर स्पेशल’ सादर होत असून त्यासाठी ऋषी कपूर यांच्या पत्नी आणि अभिनेत्री नीतू कपूर यांची हजेरी लावली. सविस्तर वाचा..
दुबई - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या टी-२० क्रमवारीत सुधारणा झाली आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत विराटने दमदार कामगिरी केली. या कामगिरीचा त्याला फायदा झाल्याचे पाहायला मिळत आहे. सविस्तर वाचा..
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा..