महाराष्ट्र

maharashtra

Top 10 @ 9 AM : सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...

By

Published : Jul 4, 2020, 9:02 AM IST

राज्यासह देशभरातील सकाळी ९ वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..

top news at 9 AM
सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...

मुंबई -मान्सूनने मुंबईत चांगलाच जोर धरला आहे. आज मुंबईसह उपनगरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे...भाजपने पंकजा मुंडे यांना केंद्रीय स्तरावर काम करण्यासाठी दारे खुली केली आहेत, मात्र मुंडे ती जबाबदारी घेणार का?... राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी छत्रपती उदयनराजेंची भेट घेतली.. त्यावेळी त्यांनी छत्रपती गादीचा मान राखल्याचे चित्र पाहायला मिळाले...यासह महत्वाच्या १० बातम्या वाचा ईटीव्ही भारतच्या टॉपटेनमध्ये..

मुंबई - भारतीय हवामान विभागाने आज (शनिवार) मुंबई शहर व उपनगरात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. आज सकाळी समुद्राला मोठी भरती असल्याने मुंबईत पाणी साचण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने आपल्या सर्व २४ विभाग कार्यालयांसह अग्निशमन दल, एनडीआरएफ, नौसेना, कोस्ट गार्ड आदी यंत्रणांना सतर्क व सुसज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

वाचा सविस्तर -मुंबईत आज अतिवृष्टीचा इशारा; महापालिका सज्ज

मुंबई- भाजपच्या नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या पराभवानंतर पक्षाच्या कारभारावर बोट ठेवत नाराजी व्यक्त केली होती. आता पंकजा यांना केंद्रात, पक्ष संघटनेत काम करण्याची संधी दिली जाणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे. मात्र पंकजा मुंडे सध्या केंद्रात जाण्यास उत्सुक नसल्याचे चित्र आहे.

वाचा सविस्तर-पंकजा मुंडे केंद्रात जाण्यास उत्सुक नसल्याचे चित्र, समर्थक ही नाराज

सातारा- छत्रपती घराण्याची सातारा ही राजधानी आहे. उदयनराजे छत्रपती घरण्याचे 13 वे वंशज आहेत. त्यांच्या स्टाईला प्रचंड प्रतिसाद मिळतो. त्यांचे बिनधास्त वागणे असल्याने अनेकांना ते आवडतात. गुरुवारी जलमंदिर या त्यांच्या निवासस्थानी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान बिनधास्त उदयनराजे, तर गृहमंत्री देसाई हे वाकून नमस्कार करताना पहिला मिळाले, हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
वाचा सविस्तर-खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना गृहराज्यमंत्र्यांचा मुजरा..?

रत्नागिरी - सध्या कोकणात भातशेतीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे कोकणी माणूस शेतीच्या कामांमध्ये व्यस्त आहे. काही लोकप्रतिनिधी सुद्धा शेतीच्या कामात व्यस्त असलेले पहायला मिळत आहेत. गुहागरचे आमदार भास्कर जाधव हेही आपल्या शेती कामांमध्ये व्यस्त आहेत. 'शेती आपली अन्नदाता आहे; त्यामुळे तिची पूजा केली पाहिजे', अशा भावना आमदार भास्कर जाधव यांनी यावेळी व्यक्त केल्या.

वाचा सविस्तर - शेती आपली अन्नदाता; तिची पूजा केलीच पाहिजे..! आमदार भास्कर जाधव शेतीकामात व्यस्त

रायगड- शासनाने नुकसनाग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी दिलेल्या पावणे चारशे कोटीच्या निधींपैकी 134 कोटी निधी प्रशासनाने बँकांकडे वर्गही केला आहे. मात्र बँकांच्या ढिसाळ कारभारामुळे हा निधी नुकसानग्रस्त नागरिकांच्या बँक खात्यात जमा झाला नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.

वाचा सविस्तर-तटकरे म्हणतात.. सरकारनं दिलं, प्रशासनानं वाटलं.. पण बँकेनं लटकवलं..!

हैदराबाद- भारतात शुक्रवारी सर्वाधिक कोरोना रुग्णांची भर पडली. मागील 24 तासात देशभरात तब्बल 20 हजार 903 नवे रुग्ण आढळले आहे. या वाढीव संख्येसह देशातील कोरोना बाधितांची संख्या 6 लाख 25 हजार 544 इतकी झाली आहे. यात 2 लाख 27 हजार 439 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 3 लाख 79 हजार 891 जण कोरोनामुक्त झाले आहे. 18 हजार 213 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

वाचा सविस्तर -देशभरातील कोरोनासंबंधी महत्वाच्या घडामोडी; वाचा एका क्लिकवर...

मुंबई- कोरोना प्रतिबंधासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमार) व भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड (बीबीआयएल ) यांच्या एकत्रित प्रयत्नातून पहिली भारतीय लस तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याच्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये यश मिळाल्यावर भारतात निर्मित होणाऱ्या या लसीबाबत आशादायी असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी सांगितले.

वाचा सविस्तर -कोरोनावर भारतीय लस : आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली 'ही' महत्त्वाची माहिती

बीड -वय वर्ष 12 असलेली मुलगी सतत मुलांसोबत खेळते, याचा राग धरून चक्क जन्मदात्या बापानेच मुलीचा प्रचंड छळ केला. एवढेच नाही तर दोन दिवस उपाशी देखील ठेवले. बापाने केलेल्या छळाला वैतागून अखेर त्या मुलीने स्वतः विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील खोकरमोह येथे गुरुवारी रात्री समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अमृता ज्ञानेश्वर देशमुख (वय १२) असे मुलीचे नाव आहे.
वाचा सविस्तर -मुलांसोबत खेळणाऱ्या बारा वर्षाच्या मुलीचा बापाकडून छळ; विहिरीत उडी घेऊन मुलीची आत्महत्या

ठाणे- अज्ञात टोळक्याकडून एका युवकाची धारदार हत्याराने निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तर याच हल्लेखोर टोळीच्या हल्ल्यात आणखी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना उल्हासनगर कॅम्प ४ मधील रेल्वे स्टेशन जवळील मद्रासी पाड्यात शुक्रवारी मध्यरात्री घडली.

वाचा सविस्तर-खळबळजनक! अज्ञात टोळीकडून तरुणाची धारदार शस्त्राने हत्या, दोन जण गंभीर जखमी

मुंबई - अनलॉक जाहीर झाल्यानंतर राज्यात 0 ते 10 वयोगटातील मुलांमध्ये, कोरोनाचे प्रमाण वाढत असून गेल्या महिन्याभरात राज्यातील लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण तिपटीने वाढले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता अशात पावसाळ्याला सुरुवात झाली असून या काळात डेंग्यू आणि मलेरियाचाही धोका वाढला आहे. त्यामुळे 10 वर्षाखालील मुलांना पुढील काही महिने घराबाहेर घेऊन पडू नका किंवा मुलांना विनाकारण घराबाहेर सोडू नका, असे आवाहन बालरोग तज्ज्ञ करत आहेत.

वाचा सविस्तर - लहान मुलांना सांभाळा... कोरोनासह 'या' आजाराचा मुलं होतायेत शिकार

ABOUT THE AUTHOR

...view details