महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Top 10 @ 7 PM : सायंकाळी सातच्या ठळक बातम्या! - अंबादास दानवे

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Top 10 @ 7 PM
Top 10 @ 7 PM

By

Published : Mar 19, 2021, 9:36 AM IST

Updated : Mar 19, 2021, 7:25 PM IST

  • पुणे- राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. राज्यात कोरोनाची ही दुसरी लाट असून या दुसऱ्या लाटेचा 'पिक पॉईंट' हा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात असू शकतो आणि राज्याचा रुग्णसंख्या वाढीचा आकडा हा 40 हजाराच्या पुढे जाऊ शकतो, असा अंदाज भारतीय वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केला आहे.

सविस्तर वाचा-महाराष्ट्रातील दुसरी लाट पहिल्या कोरोना लाटेपेक्षा भयानक असणार - डॉ.अविनाश भोंडवे

  • मुंबई - मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक सापडल्याच्या प्रकरणाचा तपास आता एनआयए आणि एटीएस करत आहे. अँटिलिया कार स्फोटक प्रकरणात आता पुण्याहून आलेली फॉरेन्सिक डिपार्टमेंटची टीम एनआयए ऑफिसमध्ये दाखल झाली आहे.

सविस्तर वाचा-Antilia Explosives Scare : फॉरेन्सिक टीमकडून गाड्यांची तपासणी सुरु

  • मुंबई - मुंबईत विविध भागातून 40 रिक्षा चोरी गेल्या होत्या. दरम्यान, अंधेरी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी या प्रकरणात तपास करत चोरांना पकडले आहे. तसेच 40 रिक्षा जप्त केल्या आहेत.

सविस्तर वाचा- Antilia Explosives Scare : फॉरेन्सिक टीमकडून गाड्यांची तपासणी सुरु

  • कराड (सातारा) - खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान लोकसभेत सातारा जिल्ह्यातून जाणार्‍या महामार्गाच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात संसदेत आवाज उठवला. त्यांच्या मागण्यांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला.

सविस्तर वाचा-खासदार श्रीनिवास पाटील यांनी संसदेत मांडल्या जिल्ह्यातील समस्या

  • डेहराडून -महिलांच्या फाटक्या जीन्स मुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेलेउत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत यांना भाजप हायकमांडकडून चौकशीासठी दिल्लीत बोलाविण्यात आले आहे. या प्रकरणाबद्दल भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा हे रावत यांची चौकशी करणार आहेत.
    सविस्तर वाचा-फाटक्या जीन्स विधानाबद्दल बीजेपी हायकमांडकडून रावत यांची चौकशी
  • नवी दिल्ली -उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांनी फाटक्या जीन्स घालण्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. रावत यांच्या वक्त्यव्यानंतर सोशल नेटवर्कींगवरुन त्यांच्यावर टीका केली जात आहे. अनेक महिला नेत्यांनाही या वक्तव्यावर टीका केली आहे. यातच काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनीही टि्वट करून रावत यांच्यावर टीकास्त्र सोडले.

सविस्तर वाचा-रिप्ड जीन्स प्रकरण : 'OMG यांचे तर गुडघे दिसतायंत, संघाच्या नेत्यांचा हाफ पॅण्टमधील फोटो शेअर प्रियांका गांधींची टीका

  • मुंबई- करण जोहरने आपल्या आगामी 'अजीब दास्तां' चित्रपटाचा टिझर रिलीज केला आहे. ५८ -सेकंदाच्या या टिझरमध्ये असामान्य आणि अनपेक्षित कथांची एक झलक पाहायला मिळते.

सविस्तर वाचा-'अजीब दास्तां'चा टिझर : चार विचित्र कथांचा अनोखा कोलाज

  • अहमदाबाद -भारताने इंग्लंडविरुद्धचा चौथा सामना आठ धावांची जिंकत मालिकेत २-२ ने बरोबरी साधली आहे. सूर्यकुमारचे अर्धशतक आणि श्रेयस अय्यरच्या आक्रमक ३७ धावांच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर १८६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. इंग्लंडचा संघ १७७ धावापर्यंत मजल मारू शकला. दरम्यान, उभय संघातील पाचवा आणि अखेरचा निर्णायक सामना २० मार्चला होणार आहे.

सविस्तर वाचा-Ind vs Eng ४th t-२० : भारताची मालिकेत बरोबरी; इंग्लंडवर मिळवला निसटता विजय

Last Updated : Mar 19, 2021, 7:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details