मुंबईतील मालाडमध्ये संरक्षक भिंत कोसळून १९ जणांचा मृत्यू
मुंबई- पश्चिम उपनगरातील मालाड येथे भिंत कोसळून १९ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री मुसळधार पाऊस सुरू असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दुर्घटनेत मोठ्या संख्येने रहिवाशी जखमी झाल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. वाचा सविस्तर....
चांदीवलीत जमीन खचली, जवळच्या इमारतीना धोका
मुंबई -मुसळधार कोसळत असलेल्या पावसाने रात्री चांदीवली संघर्ष नगर येथील जमीन खचली आहे. जवळच्या ३ इमारती खाली करण्यात येत आहेत. या ठिकाणी इमारत कोसळण्याची शक्यता असल्याने येथील रहिवाशी भयभीत झाले आहेत.वाचा सविस्तर...
राज्यात घडलेल्या घटनांवरून विधानसभेत विरोधक आक्रमक; अजित पवार म्हणाले...
मुंबई - राज्यात मंगळवार हा घातवार ठरला. मालाड, ठाणे, पुणे आणि नाशकात घडलेल्या अपघातांमध्ये एकूण ३० जणांचे जीव गेले. मुंबईत काही भागात तर परिस्थिती फारच बिकट झाली आहे. याचे पडसाद विधानसभेत उमटलेले पाहायला मिळाले. स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून अजित पवारांनी अतिवृष्टी आणि अपघातांचा मुद्दा उपस्थित केला. वाचा सविस्तर..
मालाड दुर्घटना; संजय राऊतांचे खळबळजनक वक्तव्य, म्हणाले महानगरपालिका....
मुंबई - पश्चिम उपनगरातील पिंपरीवाडा, मालाड येथे भिंत कोसळून १८ जणांचा मृत्यू झाला होता. तर, ५२ जण जखमी झाले आहेत. यावर शिवसेनेच्या संजय राऊत यांनी खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे.वाचा सविस्तर....
LIVE: मुंबई पावसाचे लाईव्ह अपडेट्स, जाणून घ्या येथे...
मुंबई -गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मात्र, मुसळधार सुरू असलेल्या पावसाने मुंबईचे जनजीवन विस्कळीत केले आहे. तसेच, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आला आहे.वाचा सविस्तर...